अरे बापरे..! रिंकू राजगुरू सोबत धक्कादयक प्रकार; कलाकारांना सुद्धा सावध राहण्याची गरज

मुंबई | सैराट चित्रपट 2016 साली रिलीज झाला होता. या चित्रपटान लोकप्रियतेची व्याख्या बदलली आहे. या चित्रपटान मराठी चित्रपटसृष्टीत 100 कोटींहून अधिक गल्ला जमवला. एवढच नाही तर या चित्रपटात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यामुळे ती आणखीनच चर्चेत राहिली आहे.
काही महिन्यापूर्वी झुंड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु या चित्रपटाला हवा एवढं प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कुठे तरी बॅकफूटवर रिंकू दिसतेय. रींकुने एका मराठी शोमध्ये आपल्या आयुष्यातील घडलेल्या अनुभवाविषयी सांगितलं.बस बाई बस या रियालिटी शोमध्ये रिंकू राजगुरू गेस्ट म्हणून आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करत आहेत. या कार्यक्रमात तिला प्रश्न विचारला आता पर्यंत घडलेला किस्सा कोणता?
त्यावर रिंकू म्हणाली की; सैराटने मला प्रसिध्दी मिळाली. अशावेळी बरेचसे चाहते 7 ते 8 किमी माझं पाठलाग करायचे. काही जणांनी तर घरी येऊन माझ्या गाडीसह सेल्फी काढल्याचे घडलं आहे. काहींनी माझ्या घरी येऊन मागणी देखील घातली. एक मुलगा तर इतका मागे लागला की तिचा पिछा सोडेना.
त्याची इतकी हिम्मत की त्याने एकदा रिंकूला अडवन्याचा प्रयत्न केला त्यानंतरच रिंकूने घरी येऊन हा प्रकार सांगितला. नंतर तर त्यानें हद्द पार केली. पैशांची सुटकेस भरून मागणी घालायला आला होता. अशावेळी तेथून त्याला हकलून लावलं. चाहते काय करतील कधीच काय सांगता येत नाही. त्यामूळे कलाकारांना सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.