‘कोई मिल गया’ चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. अनेक जण जग सोडून जात असल्याने चित्रपट सृष्टीला कोणाची नजर तर लागली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या अशाच एका कलाकाराच्या मृत्युने अभिनय क्षेत्र हादरले आहे.
कोई मिल गया हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटाने अभिनय क्षेत्राला अनेक हिरे दिले, कौचीतच असा एखादा व्यक्ती सापडेल ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा काही तासातच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला आहे.
या चित्रपटात काम केलेल्या एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. या चित्रपटांत भूमिका साकारलेले मोथीलेश चतुर्वेदी यांचं निधन झाले आहे. त्यामुळे शोककळा पसरली आहे. चतुर्वेदी हे उत्तम अभिनेते म्हणून प्रसिध्द होते.
त्यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या संधर्भात काही आजार झाला होता. तसेच त्यांना हृदय विकाराचा झटका देखील आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.