दुःखद : पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेला तरुण परत जिवंत परतलाच नाही. कारणं जाणुन डोळयात पाणी येईल

मुंबई : मूळचा वाशिमचा रहिवाशी असलेला गणेश पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता. शुक्रवारी पोलीस भरती परीक्षेतंर्गत उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरु होती. त्यावेळी 1600 मीटर धावण्याची शर्यत घेतली जात होती. गणेशने आपली 1600 मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली आणि तेवढ्यात त्याला भोवळ आली.
गणेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी सध्या अधिक तपास करत आहेत.
चालक पदाच्या या भरती प्रक्रिये अंतर्गत 17 फेब्रुवारी रोजी कलिना इथल्या कोळे कल्याण मैदानात उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्याचवेळी या भरतीसाठी आलेल्या 26 वर्षीय गणेश उत्तम उगले हा उमेदवार 1600 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण होण्यापूर्वीच चक्कर येऊन जमिनीवर पडला. गणेशला तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून गणेश मुंबईत दाखल झाला होता. भरती प्रक्रियेतील सर्व आव्हानं पार करुन पोलीस दलात सहभागी होण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण गणेशचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. गणेशच्या अशा अचानाक जाण्यानं त्याच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.