रणवीर सिंग नंतर आता या दक्षिणात्य अभिनेत्याने देखील केले न्यूड फोटोशूट…

रणवीर सिंगने एका मासिकासाठी आपल्या बोल्ड आणि लक्षवेधी न्यूड फोटोशूटने अनेकांना प्रेरित केले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आता अभिनेता विष्णू विशालने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर काही न्यूड फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याची पत्नी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने काढलेल्या फोटोंमुळे आता चांगलीच खळबळ उडाली आहे.
विष्णूने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो बेडवर झोपलेला दिसत आहे आणि त्याने बेडशीट अर्धवट अंगावर ओढले आहे. यावर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ठीक आहे… ट्रेंडमध्ये सामील व्हा! PS तसेच जेव्हा पत्नी @Guttajwala फोटोग्राफर बनते.” त्याच्या याच कॅप्शन वरून त्याचे हे फोटो त्याच्या पत्नीने काढले असल्याचे समजत आहे.
फोटोंमध्ये त्याच्या शरीराचा खालचा भाग उशीने झाकलेला आहे. यादरम्यान विष्णूने 4 वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. त्याचा फिटनेस आणि सिक्स पॅक अॅब्सही यात दिसत आहेत. विष्णूच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत.
विष्णू विशालने हे फोटो त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर चाहत्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.
विष्णू विशाल हा एक क्रिकेटर असण्यासोबतच अभिनेताही आहे. तो तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA) मध्ये उत्कृष्ट क्रिकेट खेळला आहे. यानंतर त्यानी तामिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काही चित्रपटांची निर्मिती देखील त्याने केली आहे.