वाहतूक नियम तोडल्यामुळे अजित पवारांसह ‘या’ मंत्र्यांवर झाली दंडात्मक कारवाई

मुंबई | सर्व सामान्यांना ज्या प्रकारे वाहतुकीचे नियम तोडल्यावर दंडात्मक कारवाई होते. त्याप्रमाणे मंत्र्यांना देखील होते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वाहतुकीचे नियम तोडल्यावर त्यांच्यावर 28 हजार रुपयांचा दंड होता.
त्यांनी तो दंड भरला आहे. त्यांच्याकडून कळत नकळत अनेक वेळा वाहतुकीचे नियम तोडले गेले आहेत. त्यामूळे त्यांना 28 हजार रुपयांचे दंड आकारण्यात आले होते. शिस्तीच्या बाबतीत अव्वल स्थानी असलेल्या अजित दादांनी दंड भरून जनतेपुढे एक आदर्श ठेवला आहे.
यात यादीत सर्वाधिक नियम तोडणाऱ्यांच्या यादीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नंबर लागतो. त्यांना 600 रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच नियमांचे पालन करा असे सांगणारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना 5 हजार 200 रूपयांचा दंड करण्यात आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना 14 हजार 200 रूपये दंड करण्यात आला आहे. त्यांनी विविध वेळेत नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी ही दंडाची रक्कम अद्याप भरलेली नाही.