इतर
शिवसेना खासदार भावना गवळी अडचणीत; अटक होण्याची शक्यता?

मुंबई | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना अनेक वेळा ईडीने नोटीस बजावून देखील त्या हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
गवळी यांना इडीने काल एक समन्स बजावलं आहे. जर त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. महिला उत्कर्ष मनीलॉंन्ड्रिंग प्रकरणी इडीकडे त्यांच्या विरोधात तक्रार आहे.
त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गवळी या शिवसेनेच्या विद्यमान खासदार आहेत. त्या कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतात. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील त्यांच्यावर 100 भ्रष्टचाराचा आरोप केला आहे.