सुखाचा संसार मोडला! पती पत्नी वर काळाचा घाला; कारण जाणुन धक्काच बसेल

मुंबई | कुणावर कशी वेळ येईल हे काहीच सांगता येत नाही. त्याचप्रमाणे वाईट काळात कस राहावं हे देखील माणसाला वाईट काळातच कळत असतं. हीच वेळ घालवणे फार कठीण असते. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही संकल्पना निसर्गाची देणं आहे. या माणसाने स्वीकाराव्यात. अशीच एक घटना विक्रोळीतील कन्नमवार येथे घडली. पतीच्या मृत्यूनंतर महिलेनं देखील आपला जीव सोडला. यामुळे विक्रोळीत दुःखद वातावरण दिसून येत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण:
विक्रोळीतील कन्नमवार येथे पती विनू कोशी आणि पत्नी प्रमिला कोशी हे दोघे राहतात. विनू कोशी यांना आजारी असल्यानं क्रांतिवीर महात्मा ज्योतीबा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशावेळी डॉक्टरांनी त्याची प्रकृती तपासली. अशावेळी डॉक्टरांनी विनू कोशी यांना मृत घोषित केलं. हीच बातमी पत्नी प्रमिला कोशी यांनी ऐकली असता. त्यांच्या ही अंगावरून थरकाप उडाला. त्याना देखील हृदयविकाराचा झटका आला. आधी पती आणि नंतर पत्नीने कन्नमवार परिसरात शांततेची लाट पसरली आहे.
कोल्हापूरमध्येही घडला प्रकार:
कोल्हापूरमध्ये पत्नीच्या निधनानंतर पतीनेही जीव सोडल्याची घटना पुढं आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील मांजरे गावात ही घटना घडली. पत्नीचे निधन झाल्यानंतर सायंकाळी पतीला आजारपणामुळे निधन झाले. पत्नीचे नाव ममता शंकर पोवार(वय 70 वर्षे) ,तसेच पतीचे नाव शंकर पोवार ( वय वर्षे 75) दोघांना एकाच दिवशी अग्नी देण्यात आली.
गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार; दाम्पत्याची मुलं ही मुंबईला नोकरीसाठी असतात. ते येण्यापर्यंत कोणीही अंत्यसंस्कार करू नये अशी माहिती सांगितली. मुलांना रात्री येण्यास जवळ जवळ सायंकाळचे साडे सात वाजले. तो पर्यंत अंत्यसंस्कार झाले होते.
परभणीत पतीचा पत्नीवर कटरने वार:
परभणी जिल्ह्यातील पतीने न्यायालयात तडजोड न झाल्याने पत्नीवर कटरने वार केले. तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशावेळी महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.