सुपरस्टार प्रभास च्या प्रेमात वेडी होती ही अतिशय सुंदर अभिनेत्री, मोडलं लग्न आणि आत्ता ओळखनेही झालं कठीण

केरळ | बाहुबली या चित्रपटापासून प्रसिद्धी प्राप्त केलेले अभिनेते प्रभास यांची ओळख करून देण्याची गरज भासत नाही. प्रभास यांनी केलेला चित्रपट “बाहुबली २” ने फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात यश मिळवून १७०० करोड रुपयांची कमाई करून सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले होते. हल्ली प्रभास त्यांचा आगामी चित्रपट आदीपुरुष यावर काम करीत आहेत. या चित्रपटात कृती सेनन यांना देखील मुख्य भूमिकेत पाहण्यात येईल. या चित्रपटाचा टिजर लाँच करण्यात आला आहे आणि जनतेच्या नकारात्मक प्रतिक्रिया निर्मात्यांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
या चित्रपटाच्या शूटिंग व्यतिरिक्त अभिनेते प्रभास आणि कृती सेनन यांना इतर इव्हेंट्स मध्ये जवळ पाहण्यात येत आहे. दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याची चर्चा एकायला मिळत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटोज पाहायला मिळतात आणि त्यावर लाखोच्या संख्येने जनता लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव करतात. एखाद्या अभिनेत्याचे अभिनेत्री सोबत नाव जोडले जाणे अभिनय क्षेत्रात अगदी सामान्य आहे.
आपल्याला ठाऊक आहे का? साउथ इंडस्ट्री मधील एक अतिशय सुंदर अभिनेत्री प्रभास च्या प्रेमात वेळी झाली होती. अभिनेत्रीचे ठरलेले लग्न सोडून प्रभास सोबत लग्न करण्याकरिता ती तयार होती मात्र त्यांच्या प्रेम संबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. विशेष म्हणजे ही अभिनेत्री आजही एकटेच आयुष्य व्यतीत करीत आहे.
ही अभिनेत्री इतर कोणी नसून बाहुबली या चित्रपटातील सुप्रसिद्ध पात्र देवसेना आहे. अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. साउथ चित्रपट “मिरची” या नंतर जनतेने या जोडीला अधिक पसंत करणे सुरू केले. आणि या चित्रपटानंतरच दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले असेही सांगण्यात येते. त्यानंतर या दोघांना बऱ्याच ठिकाणी एकत्रित पाहण्यात आले मात्र या नात्याला कधीही अधिकृत नाव मिळाले नाही.
ज्यावेळी अनुष्का शेट्टी यांच्या लग्नाबद्दल बोलण्यात येते त्यांच्या अविवाहित असण्यामागील कारण प्रभास आहेत असे मानले जाते. वैयक्तिक जीवनात काहीही घडत असले तरी ते दोघेही प्रोफेशनल एक्टर्स आहेत आणि ते एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. अनुष्का शेट्टी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने जनतेच्या मनावर राज्य केले आहे आणि आजही जनता त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणे पसंत करते.