इतर

दहा महिन्याचे बाळ झालं पोरकं! महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र हळहळला

बारामती |शितल जगताप गलांडे गलांडे असे या पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे त्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार चालू होते त्यांच्या निधनानंतर आता कुटुंबावर शोककाळा पसरली आहे दहा महिन्याचे बाळ आई विना परक झाला आहे. त्या बाळाचा जन्म दहा महिन्यापूर्वी झाला होता. बाळाला दहा महिने झाल्यानंतर जन्म देऊन आई जग सोडून गेली आहे. बाळ पोरके झाले.

शितल गलांडे यांची प्रसूती झाल्यानंतर त्या रजेवर होत्या प्रसूतीनंतर काही महिने झाल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली. उपचारासाठी त्यांनी पुणे येथील केम हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांचं सकाळी पहाटेच्या दरम्यान निधन झाले.

शितल जगताप या शहर पोलीस ठाण्यात संपर्क संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. त्या प्रेग्नेंट असताना सुद्धा आपली जबाबदारी ठामपणे निंबाबत होत्या. कर्तव्य त्या बजावत होत्या. त्यांचं काम म्हणजे शिस्तप्रिय प्रसन्न शरीराचा कस लावणारे होते. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. पोलीस ठाण्याचे आनंदी वातावरण ठेवण्यात त्यांचे सिंहाचा वाटा होता.

शितल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे, मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्या जाण्याने पोलीस ठाण्यात तसेच त्यांच्या कुटुंबावर शक काळा पसरली आहे त्यांच्या मागे पती मुलगी आणि दहा महिन्याचे जन्मलेले नवजात बाळ आहे ईश्वरचरणी हीच प्रार्थना की त्यांच्या मागे मुलांची ईश्वर काळजी घे हो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close