14 वर्षाच्या मुलीचे हृदयिकाराच्या झटक्याने निधन; कारण जाणुन धक्काच बसेल

करमाळा : करमाळा येथील सावंत परिवारामध्ये एक दुखद घटना घडली आहे. या परिवारातील 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीला हृदयविकाराचा त्रास झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. मृत मुलीचे नाव साक्षी सचिन सावंत असे आहे.
सध्याच्या युगात लहान मुलं फास्ट फूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे खूप कमी वयातच मुलांना वेगवेगळे आजार जडतात. हृदयविकाराने आतापर्यंत बऱ्याचदा वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे पाहिले आहे. क्वचितच काही तरुण व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येतो.
अशाच साक्षीही फक्त चौदा वर्षांची होती. तिच्या निधनाने सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साक्षी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. साक्षी विठ्ठलआप्पा सावंत यांची नात तर सावंत गटाचे नेते सुनील सावंत व नगरसेवक संजय सावंत यांची पुतणी होती. करमाळा बायपास चौकात त्यांचे एक सावंत फार्म हाऊसवर आहे. इथे साक्षीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. खूप कमी वयात या मुलीचे निधन झाल्याने संपूर्ण करमाळा शहरात शोकाची लाट पसरली आहे.