धक्कादायक! लग्नाच्या 25 दिवसांनी जोडपं निघालं होतं हनिमूनला, वाटेतच भीषण अपघातात दोघांचा मृ’त्यू….!

बिकानेर | प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नाची वेगवेगळी स्वप्ने पाहत असतो. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा आणि मुलगी दोघेही मेहनत घेत असतात. यावेळी दोघेही आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत असतात. दोघांना एकमेकांना साथ देत पुढे जायचे असते. नवीन संसार नवीन जग सुरू करायचे असते. यावेळी आपले लग्न एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक कपल हनिमूनला जात असतं. बरेच जण आपल्या घरापासून दूर एका वेगळ्या शहरामध्ये जाऊन सेलिब्रेट करतात. मात्र एका 25 दिवसांच्या जोडप्यावरती हनिमूनला जात असताना काळाने घाला घातला आहे.
कुटुंबीयांच्या संमतीने त्या दोघांचे लग्न झाले. दोघांच्याही कुटुंबातील सर्व सदस्य खूप खुश होते. बँड बाजाच्या तालावर नाचत वरात घरी आली. वधू आणि वर या दोघांनीही आपले लग्न खूप एन्जॉय केलं. त्यानंतर लग्नाला २५ दिवस झाले. दोघांनीही राजस्थानला हनिमूनला जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या कारमध्ये बसून दोघेही हनिमूनला निघाले. मात्र ते हनिमूनला पोहोचू शकले नाही. रस्त्यातच यमराजाने त्यांना बोलावून घेतले.
बिकानेर रोड येथील भोजुरस कुंडीयाजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये नवविवाहित दांपत्य गंभीर जखमी झाले. एका ट्रकने या दोघांच्या कारला धडक दिली. यात त्यांची कार चिरडली गेली. बिकानेर पोलिसांनी यावेळी घटनास्थळी धाव घेत या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना बिकानेर हॉस्पिटलमध्ये देखील पाठवले गेले. मात्र उपचार सुरू असताना या दोघांचा एकाच वेळी मृत्यू झाला.
पोलिसांनी कुटुंबीयांना याची माहिती दिली त्यावेळी संपूर्ण कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. नुकताच सुरू झालेला संसार पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळून गेला. या घटनेमुळे दोन्हीही परिवारातील सदस्य फार दुःखी आहेत. पोलिसांनी शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहेत. कुटुंबीयांनी सदर ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ऋषीपाल याने सांगितले की माझा भाऊ विशाल कुमार – वय 25 आणि वहिनी नेहा कुमार – वय 24 या दोघांचे लग्न होऊन 25 दिवस झाले होते. हे दोघेही हनिमूनसाठी राजस्थानला जात होते. यावेळी भोजुरस बस स्थानकाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. ऋषीपालने ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्यावरती विविध कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे.
संसार सुरू होण्याआधीच तो मोडकळून पडल्याने या दोघांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. नवविवाहित दांपत्याचा अशा पद्धतीने झालेला अपघात सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारा आहे.