विशेष

लाडक्या लेकाचे आई वडीलांसमोर गेला जीव, आवध्या वयाच्या ८ व्या वर्षी सोडला जीव. परिसर हळहळला

बुलढाणा: गेल्या काही दिवसात शहरात बरेच अपघात झाले. दोन दिवसापूर्वीच अपघातात एस टी मधील अपघातात दोन युवकांना आपला हात गमावल्यानंतर आता पुन्हा एकदा मोटारसायकल वरून जाणाऱ्या एका आठ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. नांदुरा या ठिकाणी ट्रकच्या धडकेत मोटर सायकल वरील मुलगा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

 

त्याच बरोबर त्या मुलाचे आईवडील हे दोघेही जखमी झाले असल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या वेळी ७.३९ वाजता घडली. या अपघात मध्ये मृत पावलेल्या मुलाचे वडील दरबारसिंग हे भारतीय सैन्यात काम करत आहेत. दरबरसिंग आणि त्याची पत्नी या दोघांना खामगाव मधील हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी घेऊन गेले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार दाबेराव हे आपल्या पत्नी आणि मुलास घेऊन मोटारसायकल वर नांदुरा कडे येत होते त्यावेळी त्याच्या गाडीला ट्रक ने जबर धडक दिली. या धडकेत डाबेराव यांचा मुलगा जागीच मरण पावला. या मृत झालेल्या मुलाचे नाव हे आयुष दरबारसिंग डाबेराव वय आठ वर्ष होत. त्याचे वडील दरबारसिंग डाबेराव हे ३२ वर्षाचे आहेत तर आई माधुरी ही गंभीर जखमी झाली आहे. यातील दरबार सिंग आणि माधुरी यांच्यावर उपचार चालू आहेत.

 

या अपघातात मरण पावलेल्या आयुष चे शव विच्छेदन रविवारी सकाळी केलं आहे. काही दिवसापूर्वी सुट्टी कडून दरबार सिंग गावी आले होते . या प्रकरणात पोलिसांनी अजूनही हस्तक्षेप केलेला नाही. चिमुकल्या मुलाचा मृत्य झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या लाडक्या लेकाचा जीव डोळ्यासमोर जात असताना आई आणि बाप पाहत होते पण त्यांना त्यावेळी काहीच करता येत नव्हते. रस्ते अपघातामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close