आईवडिलांना बाय करत क्लास ला निघालेल्या मुलाने, आपल्या जीवनाला कायमचेच बाय केले.

नालासोपारा :नालासोपारा मधील वसंत नगरीत राहत असलेल्या १७ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आनंद k प्रशांत असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचे अद्याप कारण सापडले नाही.
आनंद हा आयटी विभागातून शिक्षण घेत होता. दररोजच्या प्रमाणे आनंद आज सोमवारी देखील आपल्या आई आणि वडिलांना बाय करत क्लास साठी निघाला होता. परंतु घरातून बाहेर पडल्यावर तो बिलडिंगच्या टेरेस वर गेला आणि काही क्षणातच त्याने वरून उडी मारत आपले जीवन संपवले. या घडलेल्या प्रकारात आनंदचा जीव त्याच ठिकाणी गेला.
आनंद बिल्डिंग वरून खाली पडल्यावर आवाज मोठ्याने झाला.त्यावेळी तेथील राहत असणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. आनंदला वाचण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. परंतु उपचार करण्यापूर्वीच आनंद मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
आनंद ने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परिसरातील लोकांनी आनंद ने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली. पोलिस घटना झालेल्या ठिकाणी पोहोचले परंतु आनंद ने आत्महत्या केल्याचे कारण अजूनही समजले नाही.