इतर

देव तारी त्याला कोण मारी! रिक्षाची धडक लागल्याने 25 ते 30 विद्यार्थ्यांनी भरलेली बस धरणाच्या पाण्यात पडणार होती तितक्यात ….!

रत्नागिरी | दैव बल्वंतर असेल तर मृत्यूला देखील चकवा देता येतो. आतापर्यंत तुम्ही अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यामध्ये अपघातात वाचण्याची तीळ मात्र देखील शक्यता नसते. मात्र त्या अपघातातून ती व्यक्ती अगदी सुखरूप वाचते आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत सुद्धा होत नाही. अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या आणि वाचल्या असतील. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. मात्र यावेळी होणारा अपघात हा 25 ते 30 विद्यार्थ्यांचा बळी घेऊ शकला असता.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाहून वाडगावला जाणाऱ्या एका एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात रत्नागिरी जिल्ह्यातील बेनी धरणाजवळ घडला. यावेळी रिक्षाला धडक दिल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले. बस अगदी वेगामध्ये धरणामध्ये पडणार होती. मात्र मध्ये एक झाड आल्याने ही बस धरणातील पाण्यात पडली नाही. बस मध्ये काही विद्यार्थी आणि प्रवासी होते.

सदर घटना 15 ऑगस्ट च्या दिवशी घडली. सकाळी झेंडावंदन केल्यानंतर 25 ते 30 विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या घरी जाण्यासाठी बस मध्ये बसले होते. यावेळी या बस मध्ये काही प्रवासी देखील होते. दुपारी १ च्या सुमारास ही बस लांजा येथून रवाना झाली. त्यानंतर दुपारी १.३० च्या सुमारास ही बस बेनी येथे पोहोचली. यावेळी समोर असलेल्या ( एम एच ०८ के २५६५) रिक्षाला, ( एम एच १४ बी टी ३००५ ) बसची धडक लागली.

यामध्ये रिक्षा चालक जखमी झाला आहे. त्याच्यावरती नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्यावेळी बस रिक्षाला धडकली तेव्हा बस मधील वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस साईड पट्टी ओलांडून पुढे गेली. यावेळी बस धरणात पडणार होती मात्र मध्ये एक झाड आल्याने बस त्या झाडाला अडकली. यावेळी तातडीने वाहन चालक खाली उतरला आणि त्याने बसमधील सर्व विद्यार्थी आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे सदर घटनेत कुणाचीही जीवित हानी झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *