विशेष

बापाच्या डोळ्यांदेखत गोंडस चिमुकल्याला गिळल मगरीने. व्हिडिओ पाहून धक्का बसेल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसात रस्ते अपघातात बळी गेले तर काही जण समुद्रातील अथवा प्रयत्न करत असताना बळी गेले. दिल्लीमध्ये अशीच एक दुःखद घटना घडली आहे. एका चिमुकल्याला त्याच्या बापा समोरच मगरिने गिळले आहे. या घटनेमध्ये चिमुकल्याचा बाप सुध्दा जखमी झाला आहे. वडील आणि मुलगा नावेत बसून मासेमारी करण्यासाठी गेले तेव्हा ही घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओ मध्ये असं दिसत आहे की पित्या समोरच एका मागरिने चिमुकल्याला तोंडात धरून घेऊन जात आहे. मगर चिमुकल्याला डोळ्यादेखत घेऊन जात आहे. आणि वडील मात्र काहीच करू शकत नाहीत. त्या एक वर्षाच्या बाळाला जिवंत मगर घेऊन जात आहे.

 

ही घटना गुरुवारी सबाह येथील लाहाद दातू या नदीच्या तीरावर घडली. लहान बाळ हे आपल्या वडीला सोबत नदीमध्ये मासेमारी करत होते त्यावळेस ही घटना घडली. मागरीने अचानक त्या नावेमध्ये असलेल्या बापलेकांवर हल्ला केला. या हल्यात बाप जखमी झाला तर एक वर्षाच्या मुलाला मगरीन गिळून टाकले.

 

पित्यासमोर बाळाला मगरिन तोंडात धरून पाण्यात निघून गेली. पित्याने बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नांमध्ये पित्याला जखमी व्हावे लागले.त्याने बाळाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही. मगरिणे मुलाला तोंडात पकडल्याच व्हिडिओ मध्ये नीट दिसत नाही.

 

व्हिडिओ शूट हे जास्त अंतरावरून करण्यात आले असल्यामुळे चित्र नीट दिसत नाही. तेथील प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की मगर मुलाला तोंडात धरून लगेच पाण्यात गेली. खूप प्रयत्न करून किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांनी ४० वर्षाच्या बापाला वाचवले. त्यालाही मगरी बरोबर झालेल्या झटपटी मध्ये जखमा झाल्यात. परंतु त्याचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे किनाऱ्यावरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नदी मध्ये असलेल्या मुलाचा मृत देहाचा तपास हा पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे.

व्हिडिओ लिंक – https://youtu.be/T6mMmnJ2T-A

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close