तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराचे झाले निधन; कारण जाणून धक्काच बसेल

मुंबई | तेलगू चित्रपट सृष्टीमध्ये कलाकारांचे निधन होण्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कलाकाराचे वेगवेगळ्या कारणाने निधन होत आहे. काही दिवसांपूर्वी सरथ चंद्रन या अभिनेत्याने आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले. आता आणखीन एका कलाकाराचे निधन झाले आहे.
चित्रपट समीक्षक आणि रेडिओ जॉकी असलेला कौशिक एम एल आता आपल्यामध्ये नाही. खूप कमी वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे संपूर्ण तमिळ सिनेसृष्टी दुखात विलीन झाली आहे. सोशल मीडियावर दुःखाचा पूर आला आहे.
समीक्षक आणि रेडिओ जॉकी असलेल्या कौशिकच्या निधनानंतर तमिळ मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार हादरून गेले आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनावरती अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर सतत कलाकार त्याच्याविषयी श्रद्धांजली वाहत पोस्ट शेअर करत आहेत. अभिनेता विजय देवरकोंडा याने लिहिले आहे की, ” तुझा विचार करत मी देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तू आता आमच्यामध्ये नाहीस मात्र मी तुला खूप मिस करेन.” आपल्या ट्विटर अकाउंट वर अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
कीर्ती सुरेश या अभिनेत्रीने देखील कौशिकला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने लिहिले आहे की, ” कौशिकच्या निधनाची बातमी कळली आणि मला मोठा धक्का बसला. असे काही घडले आहे यावर माझा विश्वास बसत नाही. त्याच्या कुटुंबीयांनी प्रति माझ्या मनात संवेदना आहेत. झालेल्या घटनेवरती मला अजूनही विश्वास बसत नाही.”
त्याचबरोबर निर्माते व्यंकट प्रभू यांनी देखील पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ” काही दिवसांपूर्वीच मी त्याला भेटलो होतो. कधी काय घडेल याचे काहीच सांगता येत नाही. त्याच्या कुटुंबीयां प्रती आणि मित्रपरिवारा प्रती माझ्या मनात सद्भावना आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.”
सोशल मीडियावर अनेक कलाकार मंडळी कौशिकला श्रद्धांजली वाहत आहेत. त्याचबरोबर त्याचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. एक रेडिओ जॉकी असल्याने तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायचा. मात्र आता त्याचे निधन झाल्याने सर्वजण मोठ्या दुःखात आहेत.