
दिल्ली | साऊथ इंडस्ट्री बरोबर बॉलीवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाचे निधन झाले आहे. गायकाच्या निधनाने अनेक व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बंबा बक्या असे गायकाचे नाव आहे. बंबा यांनी बॉलीवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे निधन झाल्याने सर्व चाहते मोठ्या दुःखात आहेत. बंबा यांनी पोनीयिन सेल्वन आणि इरावीन निजल अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
अगदी लहान असताना पासूनच त्यांनी गाणी गायला सुरुवात केली होती. ते जेव्हा फक्त आठा वर्षांचे होते तेव्हा त्यांनी त्यांचे पहिले गाणे गायले होते. हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन संगीताचं काम करायचे असे ठरवले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी डिंगू डोंगू, काळमे काळमे, रती, पोनि नाडी अशी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.
त्यांच्या आई बाबांनी त्यांचे नाव
भक्कीराज ठेवले होते. पुढे त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीत त्यांना बंबा बक्या या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी 2.0 या चित्रपटात पुलीनांगल हे गाणं गायलं होतं त्यांचं हे गाणं प्रचंड हिट ठरलं. त्यांच्या कारकिर्दीत ए आर रहमानने त्यांना खूप पुढे आणले. ए आर रहमान बरोबर बंबा बक्या यांनी अनेक कामे केली. मणिरत्नम या चित्रपटात देखील त्यांनी एक गाणं गायलं आहे लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुरुवारी त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचे जागीच निधन झाले. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितनुसार त्यांना आणखीन अनेक आजारांनी देखील ग्रासले होते. त्यामुळे सुरू आलेल्या उपचारांवर त्यांचे शरीर सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. अशात वयाच्या फक्त 49 व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली.