पुरुष आपल्या पत्नीला या ३ गोष्टी कधीच सांगू शकत नाही, जाणून घ्या काय आहे ते गुपित…..

मुंबई -पती पत्नी आणि अगदी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे एक अनमोल नातं आहे. अनेक मुला मुलींना आपल्या पार्टनरच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. सर्वच मुली आपल्या पार्टनरला आपल्या आयुष्यातील सर्व खाजगी गोष्टी सांगतात. आपल्या मनातील सुख आणि दुख या सर्वच गोष्टी त्या पतीला किंवा बॉयफ्रेंडला सांगत असतात. मुलं देखील आपल्या प्रियसीला आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगतात. मात्र यामध्ये तीन अशा गोष्टी आहेत ज्या महिलांना कधीच माहिती होत नाहीत.
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पती-पत्नी यांच्यातील प्रेम कितीही प्रामाणिक असलं तरी मुलांच्या आयुष्यातील या गोष्टी मुलींना कधीच माहीत होत नाहीत. आता हे सर्व वाचून अनेक मुली अथवा अनेक स्त्रिया असं समजत असतील की असं काही नाही आहे. मला माझ्या प्रिय पतीबद्दल सर्व काही माहिती आहे. तुम्ही देखील असं समजत असाल तर जरा थांबा. कारण हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. एक पुरुष आपल्या आयुष्यातील या तीन गोष्टी कधीच कोणत्याच महिलेला सांगत नाही. त्या तीन गोष्टी आज या बातमीतून जाणून घेणार आहोत.
वेदना आणि आजारांचे दुःख -एक पुरुष आपल्या आयुष्यातील वेदना आणि आजार नेहमी स्त्रीपासून लपवत असतो. आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार स्त्री ही कमकुवत आणि पुरुष या बलाढ्य आणि जास्त ताकतीचा आहे असे समजले जाते. मात्र पुरुष हा देखील एक व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला देखील काही लागले तर वेदना होतात. मात्र “मर्द को दर्द नही होता…..” हा डायलॉग रेटवत प्रत्येक पुरुष विशेषतः आपल्या पत्नी समोर झालेल्या वेदना व्यक्त करत नाही.
भीती- रडतोस काय मुलगी आहेस का? हा मुलींसारखा का घाबरत आहे? असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल आणि स्वतः म्हटलं देखील असेल. मुलांना लहानपणापासूनच ते खूप शूर आहेत असं सांगितलं जातं. मात्र अनेक गोष्टींची त्यांना देखील भीती वाटते. अंधार झाला की स्त्री घाबरते. मात्र हाच अंधार अगदी भयभीत करणारा असेल तर पुरुष देखील घाबरतो. मात्र हे तो आपल्या पत्नीला कधीच सांगत नाही.
इंप्रेशन -स्त्री ही नेहमीच आकर्षक असते. तिला सुंदर दिसायला आणि स्वतःचे कौतुक ऐकायला खूप आवडते. मात्र हे ती कधीच मान्य करत नाही. हे सगळे जसेच्या तसे पुरुषाच्या बाबतीत देखील लागू आहे. पुरुष देखील या गोष्टीसाठी आतूर असतो. मात्र तो हे कधीच मान्य करत नाही.