मन सुन्न करणारी घटना! स्वतः आईने १२ दिवसाच्या बाळाचा हृदयद्रावक खु’न; कारण जाणून धक्काच बसेल

बेंगळुरू | आज कालच्या काळात अनेकांना मुलगा हवा असतो. आपण अश्या काही गोष्टी ऐकल्यात की मुलगी झाली म्हणून तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याच्या बातम्या आपण जवळपास रोज पाहात असतो. मात्र, आज आपण काही वेगळीच गोष्ट पाहणार आहोत. कर्नाटकात याविपरित एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील मंगळुरुमध्ये मुलगा नको तर मुलगी हवी म्हणून एका निर्दई आईने आपल्या नवजात मुलाची निघून हत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील कूटकुंजा गावातील आहे. पोलिसांनी सांगितले माहितीनूसार, त्या निर्दाई आई चे नाव पवित्त्रा. तिचा विवाह चार वर्षांपूर्वी बंगळुरू येथील एका व्यक्तीशी झाला होता. मात्र, पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की तिने पतीपासून वेगळा होण्याचा निर्णय देखील घेतला.
ती येवढ्या वर थांबली नाही. तिने वर्षभरापूर्वी पवित्राने तुमाकुरु येथील सेरा येथील मणिकांतसोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर ती गरोदर राहिली. येथे तिचा दुसऱ्या पतीसोबत वाद सुरु झाला. त्याच वर्षीया दरम्यान, तिला पुरुषांचा तिरस्कार वाटू लागला. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिला मुलगी व्हावी अशी तिची इच्छा होती. त्यासाठी तिने नवसही मागितला. तिला मुलगी होणार याची खात्री होती. ती प्रसूतीसाठी तिच्या माहेरी आली होती.
खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्रा यांची १९ ऑक्टोबर रोजी मंगळुरू येथील सरकारी लेडी गोशेन रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता . या दरम्यान तिला एक मुलगा झाला. तिला मुलगा झाल्याची बातमी कळताच तिला खूप वाईट वाटले. तिने मुलाला हातही लावला नाही किंवा त्याला दूधही पाजले नाही. महिलेने आपल्या वहिनीला सांगितले की तिला मुलगा नको होता तिला मुलगी हवी होती.
रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. रविवारी ती सुलियाच्या कुटकुंजा गावातील बस्तीकडूच्या घरी गेली होती. दुपारी ३.१५ च्या सुमारास तिने आपल्या नवजात बाळाला मुलाला घरासमोरील विहिरीत फेकून दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक हृषिकेश सोनवणे यांनी सांगितले की, पवित्राच्या वहिनीने पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली.
त्या गावातील वहिनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले. गावातील दोन माणसे विहिरीत उतरली आणि त्यांनी मुलाला पटकन बाहेर काढले. त्याला पांजा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुपारी ४.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अश्या या निर्दई आईला अटक करण्यात आली आहे. त्या निष्पाप बाळाला भावपुर्ण श्रद्धांजली