एका आईने स्वतःसह ३ वर्षांच्या मुलीला लावून घेतला गळफास, एकाच चितेवर दोघींना दिली अग्नी, संपूर्ण गाव ओक्साबोक्षी लागले रडू ….. !

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःसह आपल्या दोन मुलांना मारण्याचा प्रयत्न केला. त्या आईने स्वतःला गळफास लावून घेतला आणि तिच्या दोन्ही मुलांना देखील गळफास लावला. यामध्ये मुलीचा आणि आईचा मृत्यू झाला असून मुलगा मात्र सुदैवाने बचावला आहे. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी इथे धाव घेतली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय २५) आणि आरोही विजयकुमार माळगोंडे (वय ३) या दोघींचा मृत्यू झाला आहे. दोघी मायलेकींनी एकत्र आपली जीवन यात्रा संपवली आहे. तसेच या दोघींना एकाच चितेवरती अग्नी दिली गेली. या दुखद घटनेने संपूर्ण गाव होरफळून निघाला आहे.
पाच वर्षांपूर्वी प्रीतीचे लग्न झाले. कोरवळी येथील विजयकुमार माळगोंडे या तरुणा बरोबर तिचे लग्न लावून देण्यात आले. हे दोघेही शेतातील एका घरामध्ये राहत होते. सुरुवातीला या दोघांचा संसार अतिशय छान पद्धतीने सुरू होता. या दोघांना दोन मुलं देखील झाली. आरोही आणि बसवराज असे त्यांच्या दोन मुलांची नावे आहेत. मात्र यातील आरोही आता या जगात नाही.
सुखी संसार सुरू असतानाच मध्येच प्रीती आणि तिच्या पतीमध्ये वादाची ठिणगी पेटली. त्यानंतर या दोघांमध्ये खूप वाद होऊ लागले. विजयकुमार प्रीतीला कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. प्रीतीने त्याला खूप चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे वागणं दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललं होतं. पतीच्या याच जाताला कंटाळून प्रीतीने टोकाचे पाऊल उचललं आहे.
प्रीतीने तिच्या दोन्ही मुलांना फास लावला होता. घरात असलेल्या लोखंडी रॉडला साडीच्या सहाय्याने तिने आधी दोन मुलांना फास लावला. त्यानंतर तिने स्वतःला देखील हा फास लावून घेतला. यामध्ये दोघी मायलेकी मृत पावल्या मात्र मुलाचा फास हा थोडासा सैल असल्याने तो थोडक्यात बचावला. प्रीतीचा मुलगा हा अवघ्या दीड वर्षांचा आहे. घटना घडल्यानंतर प्रीतीचे आई-वडील आणि गावातील इतर ग्रामस्थ इथे हजर झाले.
यावेळी प्रीतीच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश करत टाहो फोडला. प्रीतीच्या कुटुंबीयांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिलेली आहे. माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्रीतीचे आणि लहान मुलीचे शव शवविच्छेदनासाठी नेले. त्यानंतर या दोघींना एकाच चितेवर अग्नी दिली गेली.
मयत प्रितीच्या भावाने मल्लिनाथ मंगरुळेने पोलिसांत विजयकुमार विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. माझ्या बहिणीचा छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील विजयकुमारला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.