गुजराती आणि हिंदी सिनेसृष्टीवर कोसळला दुःखाचा डोंगर; अनेक प्रसिद्ध मलिकेत काम केलेल्या दिग्गज कलाकाराचे निधन

मुंबई | मनोरंजन विश्वातील कलाकारांचे सातत्याने होत असलेले निधन पाहून अनेक चाहत्यांच्या मनात धडकी भरत आहे. अनेक चाहते मनोरंजन विश्वाला नेमके काय झाले आहे? असा प्रश्न विचारत आहेत. कारण आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रातील एका दिग्गज अभिनेत्याची प्राणज्योत मालवली आहे.
यंदा अनेक कलाकार गायिका तसेच वेगवेगळ्या कला क्षेत्रातील कलाकारांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध लेखिका माधुरी गयावळ यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचे निधन अनेकांना चकित करणारे होते. ऑनलाइन कार्यक्रम सुरू असताना त्यांना ठसका लागला. यामध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ऑनलाइन कार्यक्रमात काही वेळा आधी त्या खूप छान पद्धतीने बोलत होत्या आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांचे निधन झाले. त्यामुळे सगळीकडे खळबळ जनक वातावरण पसरले होते.
त्याचबरोबर अभिनेते दीपेश भान यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ” भाभी जी घर पर है” या मालिकेमध्ये त्यांनी मलखान हे पात्र साकारले होते. त्या मालिकेमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. यातूनच त्यांचा अभिनय घराघरात पोहोचला. मनोरंजन विश्वामध्ये या सर्व कलाकारांसह प्रसिद्ध गायिका निर्मला मिश्रा यांचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले.
निर्मला मिश्रा यांना देखील हृदयविकाराचा झटका आला होता. यात त्यांची प्राणज्योत मालवली. अशात आता आणखीन एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. हिंदी आणि गुजराती सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते रसिक दवे यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची किडनी निकामी झाल्याने त्यांना खूप त्रास होत होता. त्यामुळे ते डायलिसिसवर होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा हा त्रास अधिक बळावला. यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कृष्णा आणि सीआयडी अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये ते झळकले होते. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. ” क्यूकी सास भी कभी बहू थी”या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांचे ते पती होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
रसिक दवे यांनी हिंदीसह गुजराती सेनेसृष्टीमध्ये देखील अभिनय केला. मात्र त्यांच्या आजारपणामुळे त्यांना लवकरच अभिनय क्षेत्रापासून दूर जावे लागले. हिंदी पेक्षा गुजराती सिनेसृष्टीत त्यांच्या मालिका अधिक गाजल्या आहेत. त्यामुळे गुजरात भाषिक त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आता सर्वजण त्यांना सोशल मीडिया मार्फत श्रद्धांजली वाहत आहेत.