ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्रीवर ढासळला दुःखाचा डोंगर

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्रीवर ढासळला दुःखाचा डोंगर
मुंबई | मालिका जगतात बऱ्याचशा मराठी मालिकेला कुठ तरी आता प्रेक्षकवर्ग मिळाल्याचं दिसतंय. याआधी देखील मालिकेत आलेले बरेचसे कलाकार आज चांगल्या चित्रपटांचा भाग बनलेले असून चांगली कामगिरी करतात.
तेव्हापासून मालिकेला फारच महत्त्व आलंय. तुझ्यात जीव रंगला, लागिर झाल जी, तू तिथं मी अशा अनेक मालिका होऊन गेल्या. त्यानंतर स्टार प्रवाहवरील चॅनेलवर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा चाहतावर्ग अधिक आहे.
याच मालिकेतील बऱ्याच कलाकारांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अशीच एक या मालिकेतील अभिनेत्री आहे. तिन बाबी आत्याची भूमिका केली आहे. त्या भूमिकेमुळे प्रेक्षक अजूनही मालिका पाहतात. त्या म्हणजे सारिका नवाथे आहेत.
काही दिवसांपूर्वी सारिका नवाथे यांचा त्यांच्या पतीसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पहिला होता. यामुळे ती अधिकच चर्चेत आली. परंतु आता त्याच अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मालिकाविश्र्वात गेल्या काही वर्षांपासून फारच दुःखद घटना घडताना दिसतायत. तिच्या सोशल मीडियावर ती दुःखी असलेला व्हिडिओ जिकडे तिकडे फिरत आहे.
दुःखी असण्याच कारण आता समोर आलं आहे. अभिनेत्री सारिका नवाथे यांच्या सासूच निधन झालं. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिलीय. 21 ऑक्टोंबर रोजी त्यांचं निधन झालं आहे.
सारिका नवाथे यांनी कुंकू टिकली आणि टॅटू, मोलकरीण बाई, राधा प्रेम रंगली या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. तिला दोन मुलं आहेत