सिनेसृष्टीवर शोककळा! गदर चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर दुःखाचा डोंगर, जवळील व्यक्तीच्या निधनाने रडून व्यक्त केला आक्रोश….

मुंबई | बॉलीवूडमध्ये सध्या अनेक अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या समोर येत आहे. नुकतेच आलिया भट या अभिनेत्रीने चाहत्यांना ती प्रेग्नेंट असल्याची गुड न्यूज दिली. यानंतर अनेक अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकू लागल्या. एकीकडे बॉलीवुड मोठ्या आनंदात आहे तर दुसरीकडे बॉलीवूड पूर्णता शोकाकुल वातावरणात आहे. त्यामुळे आनंद व्यक्त करावा की दुःखामध्ये शोक व्यक्त करावा असा संभ्रम निर्माण झाला आहे.
दिवसेंदिवस बॉलीवूड मधील दिग्गज व्यक्तींचे निधन होत चालले आहे. अनेक व्यक्ती या जगाचा निरोप घेत आहेत. कोणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावत आहे तर कोणी किडनीच्या वेगवेगळ्या आजारांनी मृत्यूचे दार ठोठावत आहे. बॉलीवूडमध्ये सध्या अनेक दिग्गज कलाकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन होताना दिसत आहे. आता गदर या चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीच्या आयुष्यातील खास व्यक्तीचे निधन झाले आहे.
गदर या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. कृष्णचंद्र शर्मा यांच्या निधनाने बॉलीवूडवर मोठे दुःख कोसळले आहे. कृष्ण चंद्र शर्मा यांनी देखील त्यांच्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. बॉलीवूडमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या चित्रपटांची खूप मोठी यादी आहे. आपल्या निर्मितीच्या जोरावर त्यांनी अनेक कलाकारांना प्रसिद्ध झोतात आणले. त्यांच्या निधनामुळे आता बॉलीवूड मधील सर्वच कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
वडिलांच्या निर्धनानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ” माझे वडील आता या जगात नाहीत 19 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर त्यांनी आपली साथ सोडलेली आहे. ते आता स्वर्गवासी झालेले आहेत. कृष्ण जन्माच्या मुहूर्तावर त्यांनी आपले प्राण सोडले आहे ते कृष्णाचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना कराल अशी मी आशा बाळगतो. आमच्या गोपनीयतेचा आदर करा.”
कृष्ण चंद्र शर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीत तहेलका सारखा सुपरहिट चित्रपट निर्मित केला होता. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. धर्मेंद्र यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. कृष्णचंद्र यांनी हुकूमत, श्रद्धांजली, पोलिस वाला गुंडा, जावा अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.