दोघांच्या स्पर्धेत तिसऱ्याचा बळी, कारच्या स्पर्धेत ११ वर्षीय चिमुकल्याचा निष्पाप बळी

जळगाव | जळगाव शहरात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्याला एका कारने धडक दिल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेनं जळगाव शहरात सुन्न वातावरण पसरले आहे. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने आई वडील फार दुःखी आहेत. या घटनेत त्याला कारची खूप जोरात धडक बसली.
नेहरूण ट्रॅक येथे हा 11 वर्षीय मुलगा सायकल चालवत होता. रविवारी दुपारच्या सुमारास तिथे आणखीन दोन कार आल्या होत्या. या दोन्ही कारमध्ये रेस लागली होती. त्यामुळे दोन्ही कार खूप वेगात होत्या. या रेस मधील एमएच 19 बियू 6006 हा कारने चिमुकल्याला खूप जोरात धडक दिली. यावेळी हा मुलगा 12 ते 15 फूट उंचीवर उडला. यात खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला.
मयत मुलाचे नाव विक्रांत मिश्रा ( 11) असे आहे. नेहरूण ट्रॅक वर रविवार असल्याने गर्दी होती. तसेच सुट्टी असल्याने विक्रांत देखील आपल्या काकाच्या मुलाबरोबर सुनील मिश्रा बरोबर या ट्रॅकवर खेळत होता. यावेळी तो आपली सायकल घेऊन तिथे आला होता. सायकल चालवत असताना अचानक त्याच्या समोर एक कार आली आणि त्याला जोरात टक्कर बसली. यात तो खूप वर उडाला. त्याची सायकल देखील वरती उडाली आणि एका झाडावर अडकली.
विक्रांत खाली पडल्यावर त्याला तातडीने तेथील व्यक्तींनी शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तिथे त्याला मृत घोषित केले. आता या रुग्णालयात त्याच्या आई बाबांनी आणि इतर कुटुंबीयांनी गर्दी केली. आपलं एकुलत एक बाळ या जगात नाही या विचाराने त्याच्या आईने मोठा आक्रोश केला. या घटनेने नेहरूण ट्रॅक परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
या चिमुकल्याच्या निधना नंतर त्याच्या पश्चात त्याचे वडील संतोष मिश्रा आणि आई रीचा असा परिवार आहे. तो विद्या इंग्लिश स्कूलमध्ये जलतरण विद्यालयात इत्याता चौथीत शिकत होता. त्याचे निधन झाल्याने आता त्याचे मित्र देखील फार दुःखी आहेत.