मनोरंजन

अबब! प्रसिद्ध अभनेत्रीच्या बॉयफ्रेंडला आली जिवे मारण्याची धमकी…..

मुंबई| ड्रामा क्वीन राखी सावंत हे नाव ऐकलं की, आता काय केलं हिने असा प्रश्न लगेच डोक्यात येतो. मात्र आता तिने स्वतः काही केलेले नाही. मात्र ती एका घटनेने भयभीत झाली आहे. कारण तिचा प्रियकर आदिल खानला फोनवरील एका अनोळखी मेसेजमध्ये राखीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावरून राखी चांगलीच भडकली असून तिने धमकी देणाऱ्या व्यक्तीला धमकावले आहे.

 

राखी कठोर स्वरात म्हणाली- ‘माझ्या आदिलला काही झालं तर…’. नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आदिल आणि राखी धमकीबद्दल सांगत आहेत . फोनमधील मेसेज दाखवत राखीने सांगितले की, आदिलला एका व्यक्तीने मॅसेज करत सांगितले आहे की, राखीला सोडून जा, तिच्यापासून दूर जा, अन्यथा तुम्हाला मारले जाईल. हा मेसेज वाचून राखीचा राग अनावर झाला आहे. हा मेसेज दाखवताना राखीने धमकी देणाऱ्या व्यक्तीला खडसावले आहे.

 

तसेच व्हिडिओमध्ये ती खूप रडताना देखील दिसत आहे. ती यात म्हणत आहे की, ” मी खूप दुःखी आहे, माझ्या आदिलला धमक्या येत आहेत. राखीपासून दूर राहा, आम्ही विष्णुवी गटाचे आहोत. आम्ही तुम्हाला मारून टाकू. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो यात आम्ही काय चूक केली आहे? तुम्ही आम्हाला धमक्या का देत आहात? हे माझे जीवन आहे. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही.”

 

पुढे ती म्हणते की, ” तुम्ही सगळे माझे भाऊ आहात. आज पर्यंत आदिल एवढं प्रेम मला कुणी दिलं नाही. माझं घर मोडून तिन्ही कसे सुखी रहाल. कृपया आम्हाला जगू द्या. मी कोणतीही चोरी किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही.” राखीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील तिच्या विषयी काळजी व्यक्त केली आहे. अनेक जण तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देत आहेत.

 

सिद्धू सिंग मुसेवालाच्या हत्ये नंतर अभिनय क्षेत्रात अनेक व्यक्तींना जीवघेण्या धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे सगळे भयभीत आहेत. अशात राखी सावंत आणि तिच्या बॉयफ्रेंडला देखील अशी धमकी मिळाल्याने अजूनच भीतीचे वातावरन पसरले आहे. आता असे असले तरी राखी ही एक ड्रामा गर्ल आहे. अनेक जण याला राखीचा आणखीन एक नवीन ड्रामा देखील म्हणत आहेत. मात्र यात किती तथ्य आहे हे राखीलाच माहिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close