मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीला या गंभीर आजाराने घेरल; चाहत्यांकडे करतेय ही मागणी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल…

नवी दिल्ली: भारतीय टीव्ही मालिका ‘मेरे साई’ फेम अभिनेत्रीने शनिवारी सांगितलं की मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. तिला लवकरच त्यावर उपचार करावे लागतील.

 

अभिनेत्रीने केलं या मालिकेत काम

या अभिनेत्रीने, ‘मेरे साई’, ‘नामकरण’, ‘अदालत’ आणि लोकप्रिय क्राईम शो ‘क्राइम पेट्रोल’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

 

काय म्हणाले चाहते:

“आमच्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत तू लवकर बरी हो अशी एका चाहत्याने कमेंट केली. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “लवकर बरे व्हा डियर.” ” तू सर्वात धाडसी मुलगी आहेस… लवकर बरी हो,” दुसर्‍या चाहत्याने सांगितलं.

 

अभिनेत्री अनया सोनीने तिच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले होते आणि तिच्या किडनी निकामी होण्याबाबतचे आरोग्य अपडेट्स दिले होते आणि तिच्या उपचारासाठी तिच्या चाहत्यांकडून आर्थिक मदत मागितली होती.

 

ही अभिनेत्री ‘अनाया सोनी’ आहे. आपल्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक आपल्या आजाराबाबत नोट शेअर केली आणि लिहिले की, “डॉक्टर सांगत आहेत की माझी किडनी निकामी झाली आहे आणि मला डायलिसिस करावे लागेल… माझे हिमोग्लोबिन 6.7 असून प्रकृती गंभीर आहे. मी लवकरच रुग्णालयात दाखल होत आहे मित्रांनो माझ्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा.

 

या अभिनेत्रिने सोशल मीडियावर माहिती लिहली. यामुळे येथील तिच्या चाहत्यांना तिची अधिकच काळजी वाटू लागलीय. यामुळे चाहत्यांनी तिला सल्ला दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close