निःशब्द: आई का वैरीण ग तू, स्वतःच मुलीला मारून पोलिसात केली गायब असल्याची फिर्याद.

अमृतसर : आई सारखी जगात कोणीच माया ,प्रेम करू शकत नाही असे म्हणले जाते. परंतु काही अपवादात्मक घटना घडून जातात की त्यामुळे पाषाण हृदयी चे देखील काळजाचे पाणी होते. अशीच एक पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी घटना घडली. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात एका पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणात तिच्याच आईला बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी या अमृतसर मधील मंदिरात पाच वर्षाच्या मुलीच्या मृतदेहाचे तपास करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिची आई तिच्यासोबत दिसून आल्यामुळे पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे.
अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात पाच वर्षाच्या दीपज्योत नावाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्ही च्या आधारावरच तिची आई मनिंदर कौर हिला अटक केलेली आहे. या मनींदर कौर नावाच्या महिलेने आपल्या मुलीचा मृतदेह सुवर्ण मंदिरात टाकून राजापूरां पोलीस चौकीत मुलगी गायब झाल्याची तक्रार केली. असे चीमा यांनी मिडियाशी बोलताना सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार मनिंनदर कौर या महिलेच्या सर्व हालचाली या सीसीटीव्ही मधील केमेरात दिसून आल्या. या मंदिरातील प्रबंधकानी एक व्हिडीओ पोलिसांना पाठवला होता. तसेच शोशल मीडिया वर पाठवून या स्री बद्दल माहिती सांगण्याचे आव्हान केले होते. या व्हिडिओ मध्ये महिलेच्या हातात एक लहान मुलगी होती आणि सोबत छोटा मुलगा देखील चालताना दिसत होता. या स्री ने मृतदेह मंदिरात टाकल्यानंतर पोलिसात जाऊन मुलगी गायब झाल्याची तक्रार केली.
मंदिरातील व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी तपास चालू केला. व्हिडीओत महिलेनं तिच्याच मुलीला विष दिल्याचं दिसत होत. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले तेव्हा महिलेच्या सोबत असलेला मुलगा हा मुलीचा मोठा भाऊ असल्याचं वडिलांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी मनिंदर कौर हिला अटक केली आहे. चिमुरडीला तिच्याच आईने विष देऊन मारल्यामुळे परिसरातून आईबद्दल संताप आणि मृत मुलीबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.