विशेष

दुदैवी! एकुलत्या एक मुलाचा भयानक अंत; लपाछपी खेळतो म्हणून लपायला गेलेला चिमुकला परत आलाच नाही.

Alas! The Terrible End of an Only Child; The little one who went to hide for playing hide and seek never came back.

भोपाळ : मध्यप्रदेश मध्ये एका लहान मुलाचा लपाछपी खेळत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका छोट्याशा निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चुकून विजेच्या ट्रान्सफॉर्मर चे दार उघडे ठेवले आणि अनर्थ घडला.

 

आपल्या आईवडिलांन सोबत राहत असलेला पीयूष हा त्याच्या मित्रांसोबत खेळायला आला होता. सगळेजण मिळून लपाछपी खेळत होते. पीयूष हा लपण्यासाठी ट्रान्सफॉर्मर जवळ गेला. तेथेच जवळ एक नाला होता. त्या नाल्यामध्ये विजेचा प्रवाह चालू असलेली विजेची तार पडली होती. पीयूष लपण्यासाठी नाल्याजवळ आला आणि त्याचा पाय घसरून नाल्यात पडताच त्याला विजेचा शॉक लागला.

 

पीयूष ला त्याचे दोस्त शोधत होते. ते शोधत ट्रान्सफॉर्मर जवळ आले. त्यातील एकाने तारेला स्पर्श केला तर त्यालाही शॉक बसला. त्या मुलाने पीयूष च्या पालकांना सांगितले. पीयूषच्या वडिलांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.परंतु तोपर्यंत पीयूष चा मृत्यू झाला होता.

 

ट्रान्सफॉर्मर च्या चारी बाजूने सुरक्षा तार लावली होती परंतु दरवाजा उघडा राहिल्याने पीयूष तेथे लपण्यासाठी गेला होता. त्याचवेळी पीयूष नाल्यात पाय घसरून पडला आणि त्याचा मृत्यू झाला. आईवडिलांचा लाडका एकुलता एक लेक गेल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला.

 

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे याचा मृत्यू झाला होता.जर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दार बंद केले असते तर कदाचीत पीयूष चे प्राण वाचले असते. पीयूष च्या निधनाने परिसरातील नागरिकांच्या मधून हळहळ व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close