इतर

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, ब्राझिलियन-स्पॅनिश बाइकरवर सात भारतीय नराधमांनी केला बलात्कार!

झारखंड:- ब्राझिलियन बाइकर फर्नांडा आणि तिच्या पतिवर हल्ला करणाऱ्या सात आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात भारतीय पोलिसांना यश आले आहे.

तीस वर्षांची ब्राझिलियन बाइकर आणि तिचा साठ वर्षांचा पती हे भारत ते नेपाल असा प्रवास बाईकने करणार होते.त्यासाठी त्यांनी शुक्रवारी झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यामध्ये विश्रांतीसाठी तंबू लावले होते.त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात सात व्यक्तींनी मिळून हल्ला केला होता.

आतापर्यंत झारखंड पोलिसांना पाच संशयित आरोपींना पकडण्यात यश आले आहे.झारखंड पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे.आठवड्याच्या शेवटी झालेल्या या घटने प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना पोलिसांनी सांगितले की,”या घटनेत सहभागी असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली होती आणि 2 मार्च 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.या प्रकरणातील इतर पाच संशयितांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.”

Vience y Fernanda या ब्लॉगच्या नावाने त्यांच्या सर्व प्रवासाचे ऑनलाईन चित्रीकरण करणारे हे जोडपे बांगलादेशातून त्यांच्या मोटार सायकलवरून भारतात आले होते.हे जोडपे दूमका जिल्ह्यातील हंसदिहा भागातील कुरमहाटच्या दुर्गम भागात एका तात्पुरत्या तंबूत रात्र घालवत होते,तेव्हा त्यांच्यावर किमान सात जणांनी मिळून हल्ला केला.

या जोडप्याने ही माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर दिली होती.आता हटवलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महिलेने म्हटले आहे की सात व्यक्तींचा एक गट तंबूत घुसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.या पुरुषांनी जोडप्याला मारहाण करून 10,000 रुपये रोख आणि एक अंगठी चोरल्याचाही आरोप केला आहे.

पिडीत महिलेने मंगळवारी नेपाळला जाण्यापूर्वी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की,”आम्ही रात्रीच्या मुक्कामासाठी जागा निवडली होती कारण ती शांत आणि सुंदर होती.आम्हाला वाटले की आम्ही तिथे एकटे राहिलो तर ठीक होईल.”

“भारतातील लोक चांगले आहेत.मी लोकांना दोष देत नाही,परंतु मी गुन्हेगारांना दोष देते.भारतातील लोकांनी माझ्याशी चांगली वागणूक दिली आणि माझ्यावर खूप दयाळुपणा दाखवला”,असे ती म्हणाली.

झारखंड पोलिसांनी तिच्या पतीला नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये दिले.

“झालेल्या घटनेमध्ये आठ लोक सामील होते.दोन जण तिच्या पतीसोबत होते ज्यांनी त्याला बांधले होते.पोलिसांनी यावर तत्परतेने काम केले आणि सर्व आरोपींना अटक केली”,अशी माहिती दुमका जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त अंजनेयुलु दोड्डे यांनी माहिती दिली.

“आम्ही वेगाने तपास केला आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत.आम्ही जलद खटला आणि आरोपींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू.”

या कथित हल्ल्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली, जिथे महिलांकडून दरवर्षी हजारो लैंगिक अत्याचाराची प्रकरणे नोंदवली जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close