भ्रष्टाचाराने आणखीन एक बळी! महिला अधिकारीने पैशांची केली होती मागणी; येस्टी कर्मचाऱ्याच्या मृतदेहा जवळ सापडली चिठ्ठी …..

मुंबई | भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिवस आजादी का अमृत महोत्सव म्हणून मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. भारत एकीकडे प्रगतीपथावर विराजमान होत आहे तर दुसरीकडे भारतातील भ्रष्टाचार अजूनही संपलेले नाहीत. याच भ्रष्टाचारामुळे एका कर्मचाऱ्याचा निष्पाप बळी गेला आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या कर्मचाऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपुरा जिल्ह्यातील राजुरा डेपोत भगवान यादव (३०) हा काम करत होता. वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून त्याला सतत चुकीची वागणूक मिळत होती. त्याचबरोबर त्याच्याकडून पैसे देखील उकळण्यात येत होते. महिन्याला दहा हजार रुपये देण्यास त्याला सांगितले होते. मात्र या विवंचनेत असताना त्याला हा त्रास सहन होत नव्हता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली.
आत्महत्या केलेल्या तरुणानी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे. या चिट्टी मध्ये त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद केली आहेत. सहाय्यक वाहतूक निरीक्षक टाले आणि चालक व्ही एल कोवे या दोघांचा इथे उल्लेख करण्यात आला आहे. टाले या महिला अधिकारी आणि चालक या दोघांकडून भगवानला मानसिक त्रास दिला जात होता. महिला अधिकारी त्याच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी करत होत्या. असे त्याने आपल्या चिठ्ठी मध्ये स्पष्ट लिहिले आहे.
पोलिसांनी त्याची ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे तसेच अधिक तपास सुरू केला आहे. महिला अधिकारी आणि चालक या दोघांनी याआधी देखील अनेक कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने लूट केली आहे. मात्र आतापर्यंत कोणीही त्यांच्या विरोधात आवाज उठवला नव्हता. प्रत्येक कर्मचारी भीतीने घाबरून गप्प बसलेला आहे. अशाच भगवानने तर स्वतःचे प्राण त्यागले आहेत.
भगवानच्या निधनानंतर त्याच्या पश्चात त्याची पत्नी आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्याच्या घरामध्ये तो एकटा कमवता पुरुष होता. त्यामुळे आता ही हानी भरून काढण्यासाठी त्याच्या कुटुंबातील कुणाला तरी एकाला शासकीय नोकरीत सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मुस्क्या आवळण्यात याव्या असे देखील कुटुंबीय सांगत आहेत.
महिला अधिकारीने आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीने पैसे लंपास केले आहेत. मात्र अजूनही त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवला नाही यामुळे त्यांच्यावरती नेमका कुणाचा हात आहे असा देखील सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर भगवान यादव या मृत तरुणाने याआधी देखील सदर महिला अधिकारी विरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती.
मात्र त्याच्या या तक्रारीची कोणीही दखल घेत नव्हते. हे सर्व प्रकरण साखळी पद्धतीने सुरू असल्याचे यामध्ये समजत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक खोलवर तपास करत आहेत. भगवान याच्या मृत्यू मागे वरिष्ठान पासून अधिकारी महिलेपर्यंत ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना नोकरीवरून काढून टाकावे अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.
15 ऑगस्टला भगवान ने स्वतःला बल्लारपूर येथील राहत्या घरी गळफास लावून घेतला. त्याची आई नातीला शाळेमध्ये सोडायला गेली होती. त्यावेळी परत आल्यावर भगवान अजून उठला कसा नाही म्हणून तिने दार पुढे लोटले. तेव्हा आपल्या मुलाला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. आईने मुलाला पाहून मोठा आक्रोश केला. त्यावेळी आजूबाजूच्या इतर व्यक्ती देखील तेथे दाखल आल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.