सरकारी योजना

Apghati Vima Yojana: गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळतोय लाखोंचा फायदा; लगेच करा अर्ज

Apghati Vima Yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शेतकरी वर्गासाठी नेहमीच अडचणी येत राहतात. शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा अपघात देखील होताना दिसत आहे. काही वेळेस शेतकऱ्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो. अशा वेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबावर खूप संकटे येतात. म्हणून अशा वेळी शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा या नावाने मदत करते. (Gopinath munde shetkari apghati vima yojana)

 

यामधे अपघातात शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास मदत दिली जाते. जर एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते. नक्कीच ही एक शेतकऱ्यासाठी हिताची योजना आहे. परंतु गेल्या काही महिन्यात विमा कंपनीचे नियुक्ती करण्यात आली नव्हती. याच कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत. यां बाबत जेव्हा बीड जिल्ह्यातील प्रीतम ताई मुंडे यांना कळले तेव्हा त्यांनी याची दखल घेवून त्वरित एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. (Gopinath munde shetkari apghati vima yojana online apply)

 

ही योजना चांगल्या पद्धतीने राबवावी असे खासदारांनी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे मागणी केली. राज्य सरकारने देखील या मागणीला मंजुरी दिली. राज्यसरकारने जे काही प्रस्ताव प्रलंबित होते ,त्यांना त्वरित मंजुरी द्यावी असे आदेश देण्यात आले. प्रीतम मुंडे यांच्या मागणीला नक्कीच यश आले त्यामुळे राज्यातील अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही योजना शेतकऱ्याच्या आर्थिक दृष्ट्या फार महत्वाची ठरली आहे. शेतकऱ्याचे अपघात वीज पडणे, विजेचा धक्का बसणे, साप चावणे अशा अनेक कारणांमुळे होत असतो. अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य देणारी ही योजना अमलात आणली आहे.

 

मात्र गेल्या काही दिवसात विमा कंपनी नियुक्त नव्हती . प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्यामळे शासनाने देखील याची दखल घेतली आहे. प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला देखील मंजुरी राज्य सरकारने दिली आहे. आणि त्याची कार्यवाही देखील सुरू झाली आहे. (Gopinath munde shetkari apghati vima yojana)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *