हिजाब शिवाय पहिल्यांदाच समोर आला ए आर रहमानच्या मुलीचा फोटो, तिची सुंदरता पाहून तुम्हीही म्हणाल लाजवाब…..!

बेंगलोर| माध्यमांवरती नेहमीच स्टार बरोबरच स्टार किड्सची देखील मोठी चर्चा होत असते. 80 आणि 90 चे दशक गाजवलेल्या अनेक कलाकारांची मुलं आज अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये अनन्या पांडे, सारा अली खान, जानवी कपूर हे स्टार कीड बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिस तुफान गाजवताना दिसले आहेत. अशात लवकरच आर्यन खान, न्यासा देवगन, इब्राहिम अली खान देखील रुपेरी पडल्यावर दिसणार आहेत.
मात्र या सर्वांमध्ये असेही काही स्टारकीड आहेत ज्यांना बॉलीवूड आणि बॉलीवूडची लाईमलाईट अजिबात आवडत नाही. बॉलीवूडच्या या झगमगीपासून ते भरपूर दूर आहेत. त्यातीलच एक स्टार कीड म्हणजे ए आर रहमानची मुलगी खतिजा रहमान.
खतीजा अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांपासून खूप दूर आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले. यावेळी सोशल मीडियावर तिच्या लग्नाची चांगली चर्चा रंगली होती. लग्नानंतर तिच्या वडिलांनी मोठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. या पार्टीला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र लग्नामध्ये सुद्धा खातिजाने चेहऱ्यावर मास्क लावला होता.
आजवर ए आर रहमान या प्रसिद्ध गायकाच्या मुलीला कोणीच पाहिले नाही. तिच्या लग्नाच्या वेळी देखील तिला कुणाला पाहता आले नाही. तिने रियासदिन शेख मोहम्मद बरोबर लग्न केले आहे. तिचा पती एक ऑडिओ इंजिनियर आहे. अशात लग्नामध्ये तिचा चेहरा दिसेल असे अनेकांना वाटत होते. मात्र लग्नात देखील ती मास्क लावून होती. आतापर्यंत सोशल मीडियावर हिजाब शिवाय तिचा एकही फोटो नाही. मात्र आता तिचा सुंदर चेहरा समोर आला आहे.
सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये ए आर रहमान देखील तिच्याबरोबर उभा आहे. फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत तसेच गळ्यामध्ये सुंदर असे लॉकेट घातले आहे. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून तिने चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल दिली आहे.
तसेच ए आर रहमान तिच्या बाजूला उभा आहे. तो देखील फोटोमध्ये पाहून स्मित हास्य देत आहे. ए आर रहमान याच्या मुलीचा आतापर्यंत एकही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला नव्हता. कारण आतापर्यंत ती नेहमीच हीजाबमध्ये होती. मात्र आता तिचा हा पहिलाच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो नीट पाहिल्यावर समजते की हा फोटो खूप जुना आहे. लग्नाच्या काही वर्षां आधी या दोघांनी हा फोटो क्लिक केला होता.