वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी कार्तिकी गायकवाडच्या भावाने केली मोठी कामगिरी, लाखांची गाडी केली बाबांना गिफ्ट…

- प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी अपार कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी मोठं व्हावं मोठं होऊन चांगलं नाव कमवावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आई-वडील अहोरात्र झटत असतात. आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीची चनचन भासू नये म्हणून दुप्पट काम करतात.
अशात ज्या वेळी मुलं मोठी होतात आणि आई-वडिलांच्या कामांमध्ये हातभार लावतात त्यावेळी प्रत्येक आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अनेक मुलं मोठे होऊन आपल्या आई वडिलांनी केलेल्या कर्तव्याची परतफेड म्हणून आई-वडिलांना खुश ठेवतात त्यांना हवी असलेली सर्व हाऊस मौज पूर्ण करतात. त्यातीलच एक गायिका कार्तिकी गायकवाड आणि तिचा भाऊ.
कार्तिकी गायकवाड या गायिकेने संगीत क्षेत्रात मोठे नाव कमावलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामध्ये कार्तिकी लहान असताना झळकली होती. लहान वयामध्ये देखील तिचा सूर सच्चा होता. तिच्या सुरांचे अनेक जण वेडे झाले होते. अशात ती आता बरीच मोठी झाली आहे. तसेच संगीत क्षेत्रात कामगिरी करत आहे.
प्रसिद्ध संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना कार्तिकी आणि कौस्तुभ अशी दोन मुलं आहेत. कार्तिकीने आजवर संगीत क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल ती नेहमी आपल्या आई वडिलांना त्याचं क्रेडिट देते. आई-वडिलांची कायमच तिला मोठी साथ मिळाली आहे. आता तिच्या भावाने वडिलांची मान उंचावणारे एक काम केल आहे.
याविषयी कार्तिकीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. तसेच भावाचे विशेष कौतुक देखील केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा भाऊ कौस्तुभ हा काही कागदपत्रांवर सही करताना दिसतो आहे.
त्यानंतर तिने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचे वडील मर्सडीज गाडीच्या शोरूममध्ये असल्याचे दिसत आहेत. कार्तिकीच्या भावाने वडिलांना एक मर्सडीज गाडी गिफ्ट केली आहे. तिच्या वडिलांना हे गिफ्ट मिळाल्यावरती ते गहिवरून गेलेले दिसले. कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ हा फक्त २२ वर्षांचा आहे. एवढा कमी वयात त्याने मर्सडीज सारख्या महागड्या ब्रँडची गाडी खरेदी करून ती बाबांना गिफ्ट केली आहे. त्यामुळे कार्तिकी त्याचं विशेष कौतुक करत आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिल आहे की, ” वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना मर्सडीज गाडी गिफ्ट केली.” लेकाने आपल्याला दिलेली ही भेट पंडित कल्याणजी गायकवाड यांच्यासाठी खूप मोठी आहे.