मनोरंजन

बापरे! आमिर खान बरोबर लग्न न करता फातिमा सना शेख होणार आई…

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट हा त्याच्या उत्तम टायमिंगमुळे बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आपल्या चित्रपटांसाठी आमिर खान नेहमीच जिवापाड मेहनत घेत असतो. मात्र तो त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहतो. आमिर खानने काही दिवसांपूर्वी किरण राव बरोबर घटस्फोट घेतला.

पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात या दोघांनी एकत्र काम केले होते. दोघेही एकत्र वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन काम करत होते. त्यामुळे हे कपल भरपूर फेमस झालं होतं. मात्र लग्नाच्या पंधरा वर्षानंतर या दोघांनी एकमेकांना घटस्पोट देण्याचा निर्णय घेतला. किरण आणि आमिरने घटस्फोटाची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. तसेच हा घटस्फोट ते दोघं एकमेकांच्या संमतीने घेत आहेत असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

आमिर खान आणि किरण राव या दोघांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख हिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. दंगल या चित्रपटामध्ये तिने आमिर खान बरोबर मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये तिने आमिर खानची मुलगी हे पात्र साकारले होते. या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती आमिर खान बरोबर ठग्ज ऑफ हिंदुस्तान या चित्रपटामध्ये देखील झळकली.

अशात आमिर खान आणि फातिमा या दोघांच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली आहे. या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना चाहत्यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसेल.

कारण फातिमाने अजून आमिर खान बरोबर लग्न केलेले नाही मात्र ती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती मोठा हाहाकार पसरला आहे. सर्वत्र या दोघांविषयी मोठी चर्चा सुरू आहे. ती आई होणार असल्याची माहिती तिने स्वतः चाहत्यांना दिली आहे. फातिमाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटल आहे की, मला लहान मुलं खूप आवडतात. त्यामुळे मी आता आई होण्याचा निर्णय घेतला आहे. मी एका लहान मुलाला दत्तक घेणार आहे. ज्या मुलाला कोणताच आधार आसरा नाही अशा लहान बाळाला मी सांभाळणार आहे.”

फातिमा सना शेख ही आई होणार आहे हे खरं आहे. मात्र ती एका बाळाला दत्तक घेणार असल्यामुळे ती आई होणार आहे. त्यामुळे तिने दिलेली ही माहिती नक्कीच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. तिने दिलेली ही माहिती वाचून चाहते खूप खुश झाले आहेत. तसेच अनेक जन तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close