मैत्रिणीलाच संपवलं! 10 वीतल्या प्रेयसीचा खूण ; संपुर्ण प्रकार पाहून डोळयात पाणी येईल

दिल्ली | मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने मुलीच्या घरी जेव्हा हे समजले तेव्हा तिच्या घरच्यांनी मुलाला मारहाण केली. तसेच आमच्या मुलीपासून दूर रहा असे सांगितले. या नंतर त्या मुलाने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने बदला म्हणून त्या मुलीचीच चाकू भोसकून हत्या केली. त्यानंतर ते दोघे फरार झाले. मात्र पोलिसांनी त्या दोघांना शोधून काढत त्यांना अटक केली आहे.
वंशिता ही इयत्ता दहावीत शिकत होती. ती फक्त 15 वर्षांची होती. विलेपार्ले येथे ती एका शाळेत शिकत होती. 8 महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिची माकवाना बरोबर मैत्री झाली होती. त्यानंतर एक दिवस तिच्या घरच्यांनी तिला त्याच्याबरोबर पाहिले आणि त्याला मारहाण केली. नंतर माकवानाने विशाल अनभवणे या मित्राला हाताशी घेतले आणि वांशितला भेटायला बोलावले.
वंशिता शाळेत जात असल्याचे कारण सांगून दुपारी घरून निघाली. नंतर ती माकवानाला भेटली. त्यानंतर तो तिला घेऊन एका झोपडीत गेला आणि नंतर विशाल बरोबर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. नंतर या दोघांनी तिचे शव बॅगमध्ये भरले आणि नायगावच्या परेरा परिसरात एका अज्ञात ठिकाणी टाकून दिले. तसेच तिथून निघून गेले. मुलगी घरी आली नाही त्यामुळे कुटुंबीय घाबरले होते. त्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. नंतर दुसऱ्या दिवशी तपास सुरू असताना मुलीचे शव पोलिसांच्या हाती लागले. या नंतर कुटुंबीयांनी पोलिसांना तिच्या मित्रांची माहिती दिली.
पोलिसांनी त्या दोघांचा शोध सुरू केला. यावेळी मकवानाने आपल्या आईचे दागिने विकून मोठी रक्कम बरोबर घेतली होती. नंतर विशाल आणि मकवाना या दोघांनी आपले फोन बंद ठेवले आणि वसईला आले. वसईमधून त्यांनी आपले सामान घेऊन विरार गाठले. नंतर त्यांनी वैष्णवीदेवीची ट्रेन पकडली. हत्ये नंतर त्यांचा हा प्रवास अंधेरी पासून सुरू झाला होता. अंधेरीच्या स्थानकात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दोघे कैद झाले होते.
वैष्णवीदेवी येथून त्यांनी गुजरात गाठले तसेच जवळील पैसे संपल्याने त्यांनी पालनपूर हे गाव गाठले. यावेळी पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. पोलिसांनी दोघांचे फोटो वेगवेगळ्या शहरातील पोलीस ठाण्यात पाठवेल होते. अशात मकवानाच्या आजीबरोबर जमिनीवरून वाद असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना मकावानाची टीप दिली. त्यामुळे पालनपूर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी मारहाणीचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीचा खून केल्याचे मान्य केले.