इतर
BIG BREAKING | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे ११ आमदारांसोबत गुजरातमध्ये दाखल; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

मुंबई | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे ११ आमदारांना सोबत घेऊन गुजरात मधील सुरत मध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंतर्गत वादामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ते भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज सकाळी ते ११ आमदारांना सोबत घेऊन गुजरात मध्ये दाखल झाले आहेत.
त्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. ११ आमदारांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते. यामुळे सरकारला सत्तेतून बाहेर देखील पडावं लागेल.