बिसलेरी पाण्याच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक, बिसलेरी घेताय तर ही बातमी जरूर वाचा….

मुंबई | रखरखत्या उन्हात रस्त्याने चालताना, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा कोणत्याही ठिकाणी कधीही तहान लागली की, पटकन आपण दुकानदाराला एक बिसलेरी द्या असं म्हणतो. मात्र बऱ्याचदा आपल्या हातात वेगळ्या ब्रँडची पाण्याची बॉटल दिली जाते. तर आज या बातमीतून बिसलेरी नेमकी कधी सुरू झाली आणि मार्केटमध्ये बिसलेरीची कॉपी करणारे किती ब्रँड आहेत हे जाणून घेणार आहोत.
*पहिले तर बिसलेरी कधी सुरू झाली हे माहीत करून घेऊ*
बिसलेरीची स्थापना इटालियन व्यापारी, संशोधक आणि रसायनशास्त्रज्ञ- सिग्नर फेलिस बिसलेरी यांनी केली होती. सुरुवातीला, फेलिस बिसलेरी यांनी मादक पदार्थाच्या उपयोगाच्या उद्देशाने बिसलेरी विकसित केली जी सिंचोना, औषधी वनस्पती आणि लोह क्षारांनी बनलेली होती. काही काळाने १७ सप्टेंबर १९२१ रोजी फेलिस बिसलेरी यांचे निधन झाले. त्यानंतर या कंपनीचा मालकी हक्क डॉ. रॉसी बिसलेरी यांच्याकडे आला. ते फेलिस बिसलेरी यांचे जवळचे नातेवाईक होते. रॉसी बिसलेरी यांचा एक मित्र होता ज्याचं नाव होतं खुशरू सुनटूक. भारतात देखील हा व्यवसाय चालेल या उद्देशाने खुशरू सुनटूक यांनी या कंपनीचे राईट्स घेतले.
आता आपला भारत देश त्या काळी नुकताच स्वतंत्र झाला होता. भारतात त्याकाळी पाण्याची एवढी टंचाई नव्हती. अगदी कोठेही कधीही पाणी सहज उपलब्ध होत होते. मात्र या पाण्याचा दर्जा तितकासा चांगला नव्हता. कारण आजही आपल्या देशात खेड्या पाड्यात नदी आणि विहिरीतलं पाणी न गाळता तसंच पिलं जातं. आपल्या लोकांना त्याची सवय होती. त्यामुळे आपल्याला हे पाणी पचत होतं. मात्र श्रीमंत आणि परदेशी नागरिकांना हे पाणी मोठ्या मुश्किलीने पियावं लागायचं. त्यामुळे खुशरू सुनटूक यांनी बाटली बंद पिण्याच्या पाण्याची संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांना अनेकांनी वेड्यात काढलं. पाणी विकत घेऊन कोण पित असं अनेक जण बोलू लागले. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत आणि पुढील दिवसांत या बिसलेरीचा खप वाढणार हे लक्षात घेत त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीस श्रीमंत घरांमध्ये आणि हॉटेलमध्ये बिसलेरी चांगलीच विकली गेली. मात्र नंतर ती सर्व सामान्यांपर्यंत पोहचणे देखील महत्वाचे होते. कारण फक्त हॉटेल आणि श्रीमंत व्यक्तींना बिसलेरी विकून कंपनीचा घाटा होतं होता.
*पार्ले ठरले बसलरीला जीवनदान देणारे*
१९६९ मध्ये बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर अवघ्या ४ वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी अवघ्या ४ लाख रुपयांना विकत घेतली. त्यांनी यावेळी जाहिरातीवर जास्त लक्ष दिले. यामध्ये सर्वात कमी पाणी पिऊन जिवंत राहणार प्राणी निवडला गेला. तो म्हणजे उंट त्यानंतर त्यांनी यावर जी जाहिरात बनवली ती घराघरात पोहचली. “हर पाणीकी बॉटल बिसलेरी नाही होती” अशी त्यांनी याला टॅग लाईन दिली. ही आकर्षक जाहिरात आजही आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळते. त्यामुळे आज बिसलेरीचं पाणी अनेक जन पिताना दिसतात.
अशात या बिसलेरीला अनेक जणांनी कॉपी केलं. त्यामुळेच आपल्याला बाजारात हमखास खोटी बॉटल दिली जाते. या खोट्या पाण्याच्या बॉटलने बिसलेरी प्रमाणे आपलं नाव आणि रंग ठेवला आणि त्यांनी आपल्या पाण्याच्या बॉटलला बिसलेरी ऐवजी बेलसरी, बिलसेरी, ब्रिस्ले किंवा बिसलार अशी नावे दिली आहेत. त्यामुळे बाजारात हमखास बिसलेरी घेतना आपल्याला फसवले जाते. ही फसवणूक होणार हे लक्षात घेतच बिसलेरीची जाहिरात ही “हर पाणीकी बॉटल बिसलेरी नाही होती” अशी करण्यात आली. एके काळी वेड्यात निघालेली बिसलेरी बोटलची ही संकल्पना आज बाजारात ६० अब्ज डॉलर हून अधिक कमाई करत आहे.