बॉलिवूड पुन्हा एकदा दुःखात | ‘सनम बेवफा’चे प्रसिध्द दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, या कारणामुळे अचानक मृत्यू

मुंबई| गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकेक हादरे बसत आहेत. अनेक दिग्गज कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्या निधनाच्या बातम्यांनी बॉलिवूडला धक्के बसत आहेत. अशातच आता अनेक प्रेमकथा पडदयावर खुलवणारे दिग्दर्शक सावन कुमार यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त येताच बॉलिवूड चिंतेत पडले आहे. ८६ वर्षीय सावन कुमार यांच्यावर मुंबईतील धीरूभाई अंबानी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.
सावन कुमार यांना गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराने ग्रासले आहे. तसेच त्यांच्या फुफ्फुसाच्या आजारानेही डोकं वर काढलं होतं. सावन कुमार यांचा पुतण्या नवीन कुमार याने काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. यापूर्वीही सावन कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्येत सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र आता गेल्या आठवड्यात त्यांना पुन्हा हृदयाचा त्रास सुरू झाल्याने श्वास घेण्यात अडचणी आल्या. त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सावन कुमार यांना अनेक अभिनेत्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवून देणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार, मेहमूद ज्युनिअर यांना सिनेमा इंडस्ट्रीत पहिल्यांदा पडदयावर आणले ते सावन कुमार यांनीच. नैनिहाल हा सिनेमा सावन कुमार यांनी अतिशय कमी खर्चात यशस्वी करून दाखवला होता. याच सिनेमातून हरहुन्नरी अभिनेता संजीव कुमार यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळवलं, याचं श्रेय संजीवकुमार नेहमीच सावन कुमार यांना देतात.
सावन कुमार यांनी गोमती के किनारे या सिनेमातून दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलं. या सिनेमात मीना कुमारी आणि मुमताज या मुख्य भूमिकेत होत्या. ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातील सिनेमांपासून सुरू झालेली सावन कुमार यांची कारकीर्द ही दबंग खान सलमान खानपर्यंत सुरू राहिली.
सावन कुमार यांनी त्यांच्या प्रवासातील शेवटचा सिनेमा सलमान खानसोबत केला ज्याचं नाव होतं सावन… द लव्ह सीझन. हा सिनेमा चालला नाही पण दिग्दर्शक म्हणून सावन कुमार यांनी या सिनेमानंतर पूर्ण विश्रांती घेतली. सनम बेवफा या सिनेमाने सावन कुमार यांना खूप मोठं यश दिलं.
दुपारी रूग्णालयात धाकल करण्यात आल्या नंतर त्याची तब्बेत जास्तच खालावत गेली. डॉक्टरांच्या अतोनात प्रयत्नानंतर देखील सवान कुमार यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्याचे पुतणे नवीन कुमार यानी ही माहिती दिली.