दुर्दैवी! आतंवाद्यांकडून झालेल्या बॉम्बस्फोट हल्यात जवान शहीद

दिल्ली | भारतीय सैन्य दलातून एक दुखः द बातमी समोर येत आहे. काश्मीरमध्ये एक भारतीय सैनिक शहीद झाला आहे. देशाच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत असतानाच आतंकवाद्यांकडून झालेल्या बॉमस्फोटमध्ये भारतानं एक वीर जवान गमावला आहे.
शहिद झालेल्या जवानाचे नाव प्रवीण सिंह असे आहे. आपल्या सुट्ट्या संपल्यानंतर प्रवीण पुन्हा एकदा आपल्या सेवेस रुजू झाले होते. अशात त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.
प्रवीण सिंह हे उत्तराखंड येथील भिलंगना गावचे होते. मात्र काही दिवसांपासुन ते डेहराडून येथे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. त्यांच्या पश्चात आता त्यांची पत्नी आणि ६ वर्षांचा एक लहान मुलगा आहे. पतीच्या निधानंतर आता मुलाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आलेली आहे.
प्रवीण यांचे वडील देखील भारतीय सैन्य दलाचे माझी सैनिक आहेत.
गुरुवारी २ जून रोजी ही घटना घडली. यावेळी भारतीय सैनिक हे एका खासगी वाहनातून आतंकवाद्यांची माहिती घ्यायला निघाले होते. अशात काश्मीरमधील शोपिया येथे पोहचताच त्यांच्या वाहनावर बोमस्फोटचा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात संपूर्ण गाडी उलटी पडून त्यातील तिन्ही जवान मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्यातीलच प्रवीण सिंह हे मात्र जीवनाशी सुरू असलेली त्यांची लढाई हारले आणि त्यांना वीर मरण आलं.
त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी ट्विट करत प्रवीण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वच जवन आपल्या भारत मातेसाठी जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणांचे बलिदान देतात. अशात प्रवीण यांचे बलिदान देखील खूप मोठे आहे.