Breaking – शिवसेनेचा आणखी एक मंत्री अडचणीत; न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

अकोला | राज्यात महा विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मंत्री आणि आघाडी सरकारचे नेते अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या देशमुख हे अटकेत आहेत. देशमुख यांच्या नंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील अटक करण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही नेते जेलमध्ये आहेत.
मात्र सध्या आणखी एक मंत्री अडचणीत सापडला आहे. शिवसेनेचे मंत्री बच्चू कडू सध्या अडचणीत सापडले आहेत. अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये 1 कोटी 95 लाखांचा आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने याबाबत त्यांच्यावर गंभीर स्वरूपात आरोप केले होते. त्यानंतर या संधर्भात अकोला न्यायालयाने योग्य तपास करून कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत.