Breaking | राणा दाम्पत्याला दिलासा नाही; कोर्टात काय काय घडलं

मुंबई | मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निश्चय केलेल्या राणा दाम्पत्याला आजही कोर्टाने दिलासा दिलेला नाही. न्यायालयात या बाबत युक्तिवाद झाला. मात्र न्यायालयाने या बाबत निकाल राखून ठेवला आहे.
मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला चॅलेंज केल्या प्रकरणी त्यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 7 दिवसांपासुन ते तुरुंगात आहेत. याबाबत 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती.
मात्र ती सुनावणी आज 30 एप्रिल वर म्हणजेच आज घेण्यात आली, दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला आजही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने निकाल राखून ठेऊन सोमवारी यावर सुनावणी करण्याचे सांगितले.
त्यामुळे राणा दाम्पत्याला आणखी दोन दिवस तुरुंगात राहावं लागेल. राणा यांनी मागील काही दिवसांपूर्वी घरच्या जेवणासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावर कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे तुरुंगातील जेवण करावं लागणार आहे.