मनोरंजन

खानदेशी लग्नातील हा भन्नाट डान्स नक्की पहा….

खानदेश | लग्न समारंभ म्हटलं की सगळीकडे धामधूम पाहायला मिळते. अगदी नवरीच्या घरापासून नवरदेवाच्या घरापर्यंत सर्वच नातेवाईक खूप खुश असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदाच लग्न करतो. त्यामुळे यासाठी असलेली हाऊस मौज सर्वजण पूर्ण करतात. प्रत्येक लग्नात सर्वजण डान्स करून आपला आनंद व्यक्त करतात. कारण लग्नात आणि हळदीत होणाऱ्या डान्सची मजा काही औरच असते.

हळदीला ही मजा सर्वाधिक असते. हळदीमध्ये जेवणाचा मस्त बेत असतो. तसेच सर्व वऱ्हाडी दिलखुलासपणे गाण्यांवरती ताल धरतात. प्रत्येकाच्या हळदीत आजकाल डीजे हमखास पाहिला जातो. डीजेच्या आणि बँडच्या तालावर कुटुंबातील सर्व सदस्य नाचत असतात. तसेच काही व्यक्ती खाली बसून नाचणाऱ्यांचा आनंद घेतात. अगदी असंच लग्नाच्या दिवशी देखील होतं. मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी जाते त्यावेळी वरात काढली जाते. या वरातीमध्ये नव्या नवरीचे स्वागत करत पुन्हा एकदा धमाकेदार डान्स केला जातो. याचा आनंद नृत्यातून व्यक्त केला जातो.

यामध्ये घरातील वृद्ध मंडळींपासून लहान मुलांपर्यंत सर्वच जण नाचतात. कारण यामध्ये कोणतीही स्पर्धा नसते कोण कसं नाचत आहे याकडे कुणाचच लक्ष नसतं. जो तो आपापला आनंद व्यक्त करत दिलखुलासपणे नाचत असतो. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत लग्न समारंभांमध्ये डान्स करणे ही एक परंपरा झालेली आहे. अनेक लग्नांमध्ये नवरा नवरी देखील आता एकत्र डान्स करताना दिसतात. विशेष म्हणजे आजकालच्या बऱ्याचश्या नवऱ्या या नवरदेवापेक्षा नाचण्यासाठी अधिक उत्साही असतात. त्यांचे डान्स करतानाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिलेच असतील.

 

 

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे लग्नकार्यांवरती बंधने घातली गेली होती. अशात लग्नातली ही धामधूम अनेक व्यक्तींना मिस करावी लागली. आता पुन्हा एकदा सर्व काही शिथिल झालं आहे. पुन्हा एकदा लग्न सराईला धामधूम पाहायला मिळते आहे. नवरा नवरीचा डान्स लग्नातली आणि हळदीतली धामधूम असलेला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला बघता बघता लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. हे एक वऱ्हाडी लग्न आहे. तसेच यामध्ये वऱ्हाडी गाण्यांवर नवरा नवरीने ताल धरला आहे. तसेच त्यांच्या आनंदात इतर वऱ्हाडी देखील शामील झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close