विशेष

ब्रेकिंग न्यूज | प्रियांका चोप्राच्या जवळच्या अभिनेत्रीचे निधन; म्हणाली, ” माझ्या हृदयात…..”

दिल्ली | हॉलिवूड अभिनेत्री ॲने हेचचा सहा दिवसांपूर्वी एक गंभीर अपघात झाला होता. त्यामुळे या अभिनेत्रीवर दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र आज तिचे निधन झाले आहे. यावर प्रियंका चोप्राने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रियंकाने लिहिलं आहे की, ” तुझ्याबरोबर मला काम करायला मिळाले हे मी माझं मोठं नशीब समजते. मला नेहमीच तुझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तू एक हुशार आणि मेहनती अभिनेत्री होतीस. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तुझी प्रतिमा कायमच माझ्या हृदयात खोलवर असेल.”

 

प्रियंकाच्या या पोस्टवरून समजते की ॲने हेच या अभिनेत्री बरोबर तिची किती घट्ट मैत्री होती. प्रियंका चोप्राने आतापर्यंत अनेक हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या एका चित्रपटात तिने हॉलीवुड अभिनेत्री ॲने हेच बरोबर देखील स्क्रीन शेअर केली होती. यावेळी प्रियंकाला तिचा स्वभाव खूप आवडला होता. शूटिंग दरम्यान प्रियंकाने ॲने बरोबरचे काही फोटो शेअर केले होते.

 

हे फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ॲने हेच या अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला होता. यात तिची वाचण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे तिला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवले होते. आता ही यंत्रणा काढून घेतली आहे. माध्यमांवरती आलेल्या माहितीनुसार, ॲनेच्या प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती. तिचा मेंदू पूर्णता निकामी झाला होता. तसेच तिचे शरीर देखील फार भाजले होते. त्यामुळे कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार तिला मृत घोषित केले गेले.

 

कसा झाला अपघात – एंजेलिसयेथील मार व्हिस्टामध्ये वॉलग्रोव्ह एव्हेन्यूवरील भागात एका इमारतीला या अभिनेत्रीची गाडी आदळली होती. यावेळी गाडीच्या सर्व काचा फुटल्या होत्या. तसेच गाडीचा मोठा आवाज येऊन स्फोट झाला होता. यावेळी त्या इमारतीला सुद्धा आगीने घेरले होते. तेव्हा अभिनेत्री गाडीमध्येच होती. डोक्याला मार लागल्याने तिथे ती बेशुद्ध झाली होती. मात्र अग्निशमन दलाची गाडी लगेच तिथे पोहोचली. त्यांनी आग शांत करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र या कार्यात त्यांचा एक तास गेला. त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला बाहेर काढले. तसेच एका रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते.

 

“अनादर द वर्ल्ड” या सिरीज मधून
ॲनेची प्रसिद्धी खूप वाढली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. सध्या देखील तिच्या हाती बरेचसे चित्रपट होते. या चित्रपटांचे शूटिंग देखील सुरू होते. मात्र आता अभिनेत्री आपल्याला कधीच दिसणार नाही. सोशल मीडियावर RIP पोस्टचा पूर आला आहे. अनेक कलाकार तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close