इतर
आदिनाथ सहकरीचे नारायण पाटलांकडे कंट्रोल; लवकरच सुरू करण्याच्या तयारीत

करमाळा | आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. बाहेरील कारखान्यांना ऊस द्यावा लागत आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर कारखाना हा रोहित पवार यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला होता. मात्र तालुक्यातील काही नेते मंडळींनी करार रद्द व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि कर्जाच्या रकमेत १ कोटी रुपये भरले. त्यानंतर न्यायालयाने या बाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.
सदर कारखाना हा सहकार तत्वावर चालावा, असा निकाल न्यायालयाने दिला आणि सभासदांचा मोठा विजय झाला आहे. मात्र याबाबत ओटीएस सिस्टीम ने कारखाना सुरू होणार आहे. म्हणजे कर्जाच्या रकमेतून ओटीएस करून कारखाना चालू करनार असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.