बाबा मला तो फुगा पाहिजे….” हट्ट करून 2 वर्षांच्या चिमुकलीने गमावले प्राण; घटनाक्रम वाचून डोळ्यात पाणी येईल

अमरावती | कधीकधी नियती किती वाईट आहे असे म्हणायला भाग पाडणाऱ्या घटना घडतात. कारण काही अपघात असे घडतात की क्षणात होत्याचे नव्हते होते. काळीज पिळटून निघते आणि आक्रोशाची सीमा देखील पार होते. अमरावती जिल्ह्यात अशीच एक भयंकर काळजावर घाला घालणारी घटना घडली आहे. अगदी आनंदात जत्रेला आलेल्या अवघ्या २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
पोळा या सणानिमित्त अनेक गावांमध्ये जत्रा भरते. अशीच जत्रा अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे भरली. ताना पोळ्याच्या जत्रेत यंदा एका लहान चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही मुलगी आपल्या बाबांबरोबर जत्रेला आली होती. इथे सर्व जलोषाचे वातावरण होते. खेळणे, पाळणे, गॅसचे फुगे, विविध रंगाचे चमचमणारे दिवे अशी सर्व रोषणाई इथे होती. हे सर्व पाहून चिमुकली खूप खुश झाली होती.
बाबांबरोबर जत्रा फिरत असताना अचानक तिची नजर आकाशात उंचावर असलेल्या गॅसच्या फुग्याकडे गेली. तिने तो फुगा मला पण पाहिजे असा हट्ट केला. मग तिच्या बाबांनी देखील तिला फुगा घेऊन दिला. यावेळी जत्रेत अनेक व्यापारी गॅसचे फुगे विकत होत्या. गॅसचा फुगा म्हटल्यावर त्याला हवा भरण्यासाठी सगळ्यांकडे सिलेंडर देखील होता.
ज्यावेळी या चिमुकलीला फुगा घेऊन दिला त्याचं वेळी त्या फुगे विक्रेत्याचा गॅस सिलेंडर फुटला. यात चिमुरडी खूप जखमी झाली. तिचा पाय तिच्या शरीरापासून वेगळा होऊन पडला. यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने जत्रेत आलेले सर्व व्यक्ती आणि गावकरी व्याकूळ झाले आहे. अनेकांना या घटनेने अश्रू अनावर झाले. मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव परी रोही असे आहे. ती फक्त २ वर्षांची होती. तिच्या अशा निधनाने कुटुंबीयांना दुःखाचा पारावार उरलेला नाही.
घटना घडल्यानंतर जत्रेत मोठी धावपळ सुरू झाली. यावेळी परीला जवळील अचलपूर रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तिचा पाय शरिरापसून निखळून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. अमरावतीमध्ये घातलेल्या या घटनेने जत्रा बंद केली गेली आहे. तसेच सर्व गॅस फुगे विक्रेत्यांना अधिक खबरदारी घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. चिमुकलीचा मृत्यू सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारा आहे.