इतर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यांची दुसरी पत्नी..

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर भारताच्या इतिहासातलं सोनेरी अक्षरांनी कोरलेलं एक नाव. बाबासाहेबांनी या भारताला दिलेल्या घटनेवर आज भारत देश चालला आहे. त्यांनी या देशासह दलीत समजासाठी देखील मोठी कामगिरी केली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. तसाच हात रमाईच्या रूपाने बाबासाहेबांना मिळाला. मात्र त्यांच्या आयुष्यात त्यांची दोन लग्न झाली होती. त्यांच्या दुसऱ्या लग्ना बद्दल आज जाणून घेऊ.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं या भारत देशासाठी मोलाचं योगदान आहे. त्यांच्या पाठीशी रमाई नेहमीच खंबीरपणे उभ्या असायच्या. १९०६ मध्ये बाबासाहेबांनी रमाबाईंबरोबर लग्न केलं.

यानंतर बाबसाहेब अनेक वेळा शिक्षणासाठी परदेशी जायचे. तेव्हा घरची परिस्थिती ठीक नसल्याने बऱ्याचदा रमाई आपल्या मुलांना आणि कुटुंबाला दोन वेळच जेवण देण्यासाठी शेनाच्या गौर्या विकायच्या.

मात्र त्यांनी कधीही बाबासाहेबांना याबद्दल खबरही लागू दिली नाही. त्याचं शिक्षण चांगल व्हावं आणि त्यांनी दलीत तसेच आदिवासी, चांभार, मांग, बुरुड अशा अनेक भटक्या आणि विमुक्त जमातीच्या लोकांसाठी काही तरी करावे म्हणून रमाबाईंनी बाबासाहेबांना खूप साथ दिली.

कालांतराने त्यांना काही आजारांनी ग्रासले आणि १९३५ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बाबसाहेब पूर्णतः खचून गेले.
मात्र आपल्याला झालेलं दुःख पचवत त्यांनी देशासाठी आणि समाजासाठीच कार्य सुरूच ठेवलं.

यावेळी बाबासाहेबांची प्रकृती देखील बिघडू लागली होती. कामाचा व्याप अधिक होता. त्यात घरी वेळच्या वेळी जेवण देणार आणि काळजी घेणार कोणी नव्हतं आणि कितीही नाही म्हटलं तरी मनात रमाई नसल्याचं दुःख होतंच. त्यामुळे त्यांना अनेक आजार जडले होते.

त्यामुळे मुंबईमधील डॉ. मालवणकर यांच्याकडे ते उपचार घेत होते. तिथे डॉ. शारदा कबीर ( Savita Ambedkar)या देखील त्यांच्यावर उपचार करत होत्या. त्या बाबासाहेबांना अनेक वेळा औषध न घेतल्यास ओरडायच्या देखील. बाबासाहेब आणि डॉ. शारदा यांच्यात चांगली मैत्री झाली होती.

शारदा बाबासाहेबांना वेळोवेळी औषध देण्याचे नर्सचे काम करत होत्या. त्यांच्या मैत्रीवर अनेक जन चर्चा देखील करत होते. अशात बाबासाहेब आणि शारदा हे दोघेही एमेकांना पसंत करत होते.

त्यामुळे बाबा साहेबांनी एक दिवस डॉ. शारदा यांना स्पष्ट शब्दात लग्नाचे विचारले. तेव्हा डॉ. शारदा (Savita Ambedkar) यांनी देखील लग्नासाठी होकार दिला होता. १९४८ रोजी अगदी साध्या पद्धतीने आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांचा विवाह पार पडला.

रमाई प्रमाणेच डॉ. शारदा ( Savita Ambedkar) यांनी देखील बाबासाहेबांना मोलाची साथ दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close