इतर

मन सुन्न करणारी घटना; स्वतः बाहुलीला फाशी दिल्यानंतर ८ वर्षीय मुलीची आत्महत्या

पुणेे | पुण्यातील पिंपरी येथे काळीज सुन्न करणारी एक घटना घडली आहे. आठ वर्षीय एका मुलीने घळफास घेतला आहे. आपल्या बाहुलीसाठी तिने फाशी घेतली असल्याची माहिती प्रथमतः समोर आली आहे.आपली लहान मूल काय करतात, कसे खेळतात, फोनवर टिव्हीवर काय पाहतात याकडे पालकांचे लक्ष असणे फार गरजेचे असते. एक लहान मुलं म्हणजे कोरी पाटी असते. जिच्यावर तुम्ही जे लिहाल तेच उमटते. लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यात खूप कुतूहल असते. त्यामुळे त्यांना खूप सारे प्रश्न पडतात. पालकांचं आपल्या मुलाकडे लक्ष नसल्यास मुलं आपली उत्तर स्वतः च शोधतात आणि मग असे काही काळीज सुन्न करणारे प्रकार घडतात.

फाशी घेतलेली लहान मुलगी ८ वर्षांची असून तिचं नाव कमळ खेम साउद असं आहे. २९ मे रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. घरी कमळ आणि तिची आई होती. दुपारचं जेवण झाल्यानंतर तिची आई काही कामात व्यस्त होती. त्यावेळी कमळ आपल्या बाहुली बरोबर खेळत होती.

खेळता खेळता तिने बाहुलीच्या मानेला एक रशी बांधली आणि तिला फाशी दिली. थोड्यावेळानी तिला असं वाटलं की, आपण खूप मोठी चूक केली. आपल्या मुळे बाहुलीचा जीव गेला. आता ती आपल्याला परत कधीच मिळणार नाही. त्यामुळे तिने देखील घराच्या खिडकीला स्वतः ला फाशी लावून घेतली.तची आई थोड्यावेळाने काम झाल्यावर तिच्या खोलीत आली तेव्हा तिला दिसले की, आपल्या मुलीने स्वतः ला फाशी लावून घेतली आहे. या सर्वांमध्ये या मुलीचा जागीच मृत्यू झाला.

अशात सदर घटना थेरगाव परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच वाकड येथील पोलिस घटनस्थळी दाखल झाले. यावेळी तपासात त्यांच्या असं लक्षात आलं की, या मुलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ती रोज भुताचे चित्रपट अथवा कार्यक्रम पाहात असणार असा अंदाज पोलिसांनी लावला.सदर मुलीचे वडील ते जिथे राहतात त्याच सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सुरक्षा रक्षकाच्या मुलीबरोबर असा प्रकार घडल्याने त्या परिसरात आता एक वेगळीच भीती पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close