कौतुकास्पद! पतीच्या विरमारना नंतर शहीद जवानांच्या पत्नीना प्रोत्साहन मिळण्यासाठी पत्नीचा चक्क ९००० किमी प्रवास

केरळ | कृष्णा या शहीद जवान यांच्या पत्नी आहेत त्यांच्या पती ने देशासाठी बलिदान देताना पाहिले, त्यामुळे तिला इतरांचे दुःख अधिक चांगले समजते. कोची मधील कृष्णा यांनी क्रॉस कंट्री टिओविलर वर प्रवास केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि त्यांच्या विधवांना भेटून प्रोत्साहन देणे हा या भेटीचा उद्देश होता.
मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा यानी शाहिद जवान यांच्या पत्नी ने केवळ तीन महिन्यांत ईशान्य, दक्षिण आणि मध्य भारतातील राज्ये गाडी वर कव्हर करत 9,000 किलोमीटर अंतर कापले. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यांनी 11 एप्रिल रोजी प्रवास सुरू केला. २६ जुलैपर्यंत आपले मिशन पूर्ण करून ती घरी आल्या.
कृष्णा या फक्त 19 वर्षांची होती जेव्हा तिने पती वायुसेना अधिकारी शिवराज यांना अपघातात गमावले. या दु:खातून बाहेर येत तीन महिन्यांनंतर तिने मुलीला जन्म दिला.पतीला गमावल्यानंतर बहादूर कृष्णा या स्वतः खचून न जाता कमीपणा होऊ दिला नाही. त्यांनी आपले शिक्षण तर पूर्ण केलेच पण आपले कुटुंब चालवण्यासाठी ऑल इंडियन रेडिओवर कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून नोकरीही स्वीकारली.
कृष्णा या एक रेडिओ जॉकी आहे आणि प्रसार भारतीच्या रेनबो एफएम चॅनलवर काम करते. प्रवासा दरम्यान त्यांनी भारतातील 20 आकाशवाणी स्थानकांना भेटी दिल्या.पत्रकारांशी बोलताना कृष्णा म्हणाल्या की, या यात्रेमागचा उद्देश लष्करातील जवानांच्या विधवांना प्रोत्साहन देण्याचा आहे.केरळ मध्ये नाही तर पूर्ण देशभरात त्याच्या कर्तुवा चे स्वागत होत आहे. दुसरीकडे, कृष्णा यानी अनेक महिलांसाठी उदाहरण आहेत.