खळबळजनक ! एकाच घरात मृतदेहांची पडला होता खच, कारण समजल्यावर तुम्हाला देखील येईल चिढ

चंदीगड | खंडणी, लाच घेणे आणि देणे हे दोन्ही कायद्याने गुन्हे आहेत. मात्र आजकाल सर्रास कायद्याला धाब्यावर बसवत अनेक व्यक्ती लाच घेताना दिसतात. हे गुन्हे दिवसा ढवळ्या घडत असतात. यात ज्याची कुवत नाही अथवा ज्या व्यक्तीला हे मान्य नाही त्याचा खून तरी होती नाहीतर तो स्वतः समोरच्या व्यक्तींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतो. आता पर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहे.
सध्या राज्यात शिक्षक भरती घोटाळा प्रकरण सुरू आहे. यात अनेक बोगस शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. हे सर्व प्रकरण कमी होते की, काय त्यात आता लाच न दिल्याने एका व्यक्तीने कंटाळून स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे जीवन संपवले आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील अंबाला येथील बलाना गावात ही घटना घडली आहे. घरात सहा व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा फोन पोलिसांना आला. आजूबाजूच्या व्यक्तींनी हा फोन केला होता.
यावेळी अंबाला पोलीस स्टेशन मुनीश शर्मा यांनी आपल्या टीम बरोबर घटनास्थळी धाव घेतली. एकाच घरातील सहा व्यक्तीचे मृत देह तिथे सापडले. या घटनेत पोलिसांनी खोल तपास करून याचा छडा लावला आहे. सुखविंदर असे घरातील प्रमुख व्यक्तीचे नाव होते. त्याने पत्नी, आई, बाब आणि दोन मुलींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः घरातल्या पंख्याला गळफास लावून घेतला.
पोलिसांनी लगेचच या सहा जणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र इथे सर्वांना मृत घोषित केले गेले. या घटने नंतर पोलिसांनी मृत देह शवविच्छेदन करून पोलिसांच्या ताब्यात दिले. आत्महत्या झाली त्या घरामध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली. सुखविंदरने ही सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्याच्या कंपनीतील दोन अधिकारी त्याच्याकडे १० लाखांची मागणी करत असल्याचे त्यांनी लिहिले होते. १० लाख एवढी मोठी रक्कम भरून शकल्याने त्याने स्वतःचे जीवन संपवत कुटुंबातील सर्व व्यक्तींना देखील मारून टाकले.
त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी आणि नातेवाईकांनी याविषयी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला अधिक वेग आला. पोलिसांनी सापळा रचत त्या दोघांचा देखील शोध घेतला. सुखविंदरला दोन मुली होत्या त्यातली एक जुनिअर केजी मध्ये शिकत होती तर मोठी मुलगी इयत्ता तिसरीत शिकत होती. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे सुखविंदरने आपल्या सुखी संसाराची राख रांगोळी करून स्वतः देखील मृत्यूच्या कुशीत जाऊन निजला आहे.
पोलीस उप निरीक्षक जोगिंदर सिंग यांनी सांगितले आहे की, कुटुंबातील इतर पाच व्यक्तींचे निधन हे गळा दाबल्यामुळे झाले आहे असे दिसत असले तरी अजून संपूर्ण तपास संपलेला नाही. शवविच्छेदन केल्यावर याचा आणखीन खुलासा होणार आहे. आम्ही याचा खोल तपास करत आहोत.