चित्रपसृष्टी हादरली! १ महिन्याचा चिमुकली झाली पोरकी; नेहा कक्कड सोबत काम केलेल्या गायकाचा दुर्दैवी अंत

दिल्ली | इंडियन आयडॉल हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशात यात विजय मिळवून अनेक स्पर्धकांचे जीवन पालटले आहे. यात आज आपण इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेल्या संदीप आचार्य विषयी जाणून घेणार आहोत.
याच पर्वात गायिका नेहा कक्कड देखील होती. नेहाला हरवत त्याने या शोमध्ये विजय मिळवला मात्र आज तो आपल्यात नाही. त्याच्या निधनाने सगळीकडे शोक पसरला होता. इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता होता. मात्र बॉलीवुडमध्ये तो जास्त दिवस काम करू शकला नाही. त्याची प्राण ज्योत लवकरच मालवली.
त्याने इंडियन आयडॉलमध्ये गाऊन अनेकांची मने जिंकली होती. त्याच्या आवाजाचे अनेक जण दिवाणे होते. त्याचा आवाज ऐकण्यासाठी लोक तासंतास टिव्ही समोर बसून राहत होते. त्याला एवढा सुंदर गळा आहे हे त्याच्या आई वडिलांना देखील माहीत नव्हते. एकदा शाळेच्या एका कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला होता. त्यावेळी पहिल्यांदा त्याने गाणं गायलं होतं. त्यावेळी त्याच्या घरच्यांना समजलं की, आपल्या मुलाचा गळा खूप सुंदर आहे. तो एक दिवस नक्कीच मोठा स्टार होईल.
त्यामुळे त्याने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला. याच पर्वात नेहा कक्कड देखील होती. मात्र ती तिसऱ्या फेरीतच हारली. इंडियन आयडॉलचा किताब त्याने आपल्या नावे केला तेव्हा त्याचे वय फक्त २२ वर्षे होते. या नंतर त्याच्या समोर अनेक मोठ्या प्रोजेक्टची रांग लागली. यावेळी तो एकमेव महागड्या गायकांमध्ये वरच्या क्रमांकावर होता. यावेळी तो आपल्या एका गाण्यासाठी तीन लाख रुपये मानधन घेत होता. यावेळी तो वर्षाला ६० ते ७० शो करत होता. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील त्याच्या गाण्याचे चाहते होते. त्याने नेपाळ, दुबई, अमेरिका, इंडोनेशिया, इंग्लंड, आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये शो केले होते.
‘मेरे साथ सारा जहां’ आणि ‘वो पहली बार’ हे दोन अल्बम त्याने काढले होते. हे दोन्ही अल्बम खूप गाजले. त्यानंतर त्याने ‘कैसा ये प्यार है’ हा एक अल्बम देखील काढला होता. यावेळी त्याने यात अभिनय देखील केला होता. त्याच्या तिन्ही अल्बमला चाहत्यांची खूप पसंती मिळाली. दिवसेंदिवस त्याची प्रसिध्दी वाढत चालली होती. याच दरम्यान त्याचे लग्न झाले. त्याला एक मुलगी देखील झाली. मात्र नंतर त्याला एका गंभीर आजाराने ग्रासले.
आजारामुळे त्याला गण्यांपासून दूर जावे लागले. गुरुग्राम येथील एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र हे उपचार अयशस्वी ठरले. उपचारा दरम्यान त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला होता.